0
हा उत्सव साजरा करण्यासाठी ग्राहकांसाठी एलजीच्या निवडलेल्या उत्पादनांवर विविध ऑफर देण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली- ७० वा प्रजासत्ताक दिन साजरा करताना एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाने त्यांची प्रमुख मोहीम # करसलाम' (#KarSalaam) चा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर संरक्षण करणाऱ्या भारतीय सैन्याला शुभेच्छा देण्यासाठी या पुढाकारातून संपूर्ण देशाला आमंत्रण देते. एलजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे लोक शुभेच्छा देऊ शकतात तसेच https://www.lg.com/in/karsalaam येथे शुभेच्छा पोस्ट करू शकतात.हा उत्सव साजरा करण्यासाठी ग्राहकांसाठी एलजीच्या निवडलेल्या उत्पादनांवर विविध ऑफर देण्यात आल्या आहेत. या ऑफर १८ जानेवारी २०१९ ते ३१ जानेवारी २०१९ पर्यंत असेल. या मोहिमेचा एक भाग म्हणून एलजी विविध उत्पादनांवर १५ टक्के कॅशबॅक* देणार आहे. तसेच ग्राहक एलजीची उत्पादने केवळ २६ रुपयांमध्ये खरेदी करून उर्वरित रक्कम ईएमआय किंवा २६२६ रुपये हप्त्यावर भरू शकतात.

या विषयी सांगताना एलजीचे व्यवस्थापकीय संचालक (इलेक्ट्रॉनिक्स) किम की वॅन म्हणाले की, #KarSalaam ला नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. एलजी इलेक्ट्रॉनिक्सचे भारतातील प्रमुख संपर्क अधिकारी उमेश छाल यांनी सांगितले की, देशाच्या संरक्षणासाठी कठोर परिश्रम घेत असलेल्या बहादूर सैनिकांना सलाम करण्यासाठी एलजीने हा छोटासा प्रयत्न केला आहे.
LG announces third phase of 'Kersalam' 

Post a Comment

 
Top