कोणत्याही कारणास्तव कर्नाटकातील काँग्रेस-निजद आघाडी सरकार पाडायचेच, असे ठरविलेल्या प्रदेश भाजपने आपल्या पक्षातील सर्व 104 आमदारांना हरियाणातील रिसॉर्टमध्ये ठेवले आहे. एकीकडे भाजपकडून तीव्र हालचाली आणि दुसरीकडे राज्यातील काँग्रेस-निजदची वाढती तगमग यामुळे राजकीय अस्थिरता वाढण्याची चिन्हे आहेत.
सोमवारी सायंकाळपर्यंत सर्व भाजप आमदार दिल्लीतील कर्नाटक भवनात होते. रात्री उशिरा त्यांना रिसॉर्टकडे नेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
हरियाणात भाजप सत्तेवर आहे. त्यामुळे तेथे कर्नाटकातील आमदार सुरक्षितपणे राहू शकतात. यामुळेच तेथे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी मुंबईतील रिसॉर्टमध्ये जाण्याचे ठरविण्यात आले होते. ऐनवेळी नियोजनात बदल करण्यात आला. सध्या भाजपने 112 हा जादुई आकडा कसा पार करता येईल, यावर लक्ष केंद्रित केले आहे.
मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी गुप्तचर खात्याशी नियमित संपर्कात आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार 9 आमदार बंडखोरीच्या तयारीत आहेत. आमदार रमेश जारकीहोळी यांनी बी. सी. पाटील, भीमा नायक, डॉ. सुधाकर, डी. एस. हुलगेरी, बसवनगौडा दड्डल, कंपली गणेश, बी. के. संगमेश, व्ही. मुनीयप्पा, सुब्बा रेड्डी या नाराज आमदारांशी संपर्क साधून राजीनामा देण्यासाठी मन वळविण्याचा प्रयत्न करत आहेत.
भाजपच्या हालचाली समजल्या आहेत. मुंबईत काहीजणांच्या नावे खोल्या आरक्षित झाल्या आहेत. भाजपच्या कोणत्याही आमदारांशी संपर्क साधलेला नाही. आपले सरकार स्थिर आहे. - एच. डी. कुमारस्वामीमुख्यमंत्री
ऑपरेशन कमळची केवळ अफवाच
राजकारणामध्ये संक्रांतीनंतर क्रांती होणार असल्याची वक्तव्ये वारंवार व्यक्त केली जात आहेत. पण ऑपरेशन कमळ ही केवळ अफवाच असल्याचा दावा वनमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केला आहे. बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या आवारात विकासकामांचे उद्घाटन करून ते बोल होते.
माजी मंत्री रमेश जारकीहोळी व आ. उमेश जाधव भाजप प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हीसुद्धा केवळ अफवा आहे. मुख्य सचेतक गणेश हुक्केरी यांनी देखील भाजप प्रवेशाबद्दल केलेले वक्तव्य गंमतीत केले होते, असेही जारकीहोळींनी सांगितले.
असंतष्ट आमदारांना सांभाळण्याची जबाबदारी संबंधीत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांवर सोपविण्यात आली आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना आपल्या जिल्ह्यात असंतुष्ट आमदार कोणीही नसल्याचा दावा त्यांनी केला.
विविध विकासकामांचे उद्घाटन
जिल्हा रुग्णालय आवारात नव्याने बांधण्यात आलेले कँटीन, ज्येष्ठ नागरिकांसाठी निर्माण करण्यात आलेले 100 खाटांचे रुग्णालय, बांधा, वापरा तत्वावरील स्वच्छतागृह याबरोबरच वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या वस्तीगृहाचे उद्घाटन ना. जारकीहोळी व उपमहापौर मधुश्री पुजारी व यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वीरकुमार पाटील, जयराज हलगेकर, बिम्सचे संचालक डॉ. एस. आय. कळसद, नगरसेविका जयश्री माळगी, माया कडोलकर, सरला हेरेकर, आदी उपस्थित होते.
आघाडी सरकार सत्तेवर येऊन सात महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरीदेखील ऑपरेशन कमळकडून राजकीय क्रांतीचा पुनरुच्चार करण्यात येत आहे. ही केवळ अफवाच आहे. यामध्ये कोणतेच तथ्य दिसून येत नाही.

Post a Comment