मुंबई :
डोंबिवलीतील भाजपचा पदाधिकारी धनंजय कुलकर्णीला कल्याण गुन्हेने अवैध्य शस्त्रसाठा केल्या प्रकरणी अटक केली आहे. कुलकर्णीच्या डोंबिवलीतील एका दुकानातून मोठा शस्त्र साठा जप्त केला आहे. यात तलवारी, एअरगन यासारख्या तब्बल १८० शस्त्रांचा समावेश आहे.
भाजपचे डोंबिवली शहर उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांच्या एका दुकानात पोलिसांना मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आला. यामध्ये ६२ फायटर्स, ३८ बटण चाकू, २५ चॉपर्स, १० तलवारी, ९ कुकऱ्या, ९ गुप्त्या, ५ सुरे, ३ कुऱ्हाडी, १ कोयता आणि १ एअरगन यांचा समावेश आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून एवढा मोठा शस्त्रसाठा मिळाल्याने एकच खळबळ माजली आहे. एवढा शस्त्रसाठा कशासाठी जमा केला होता. याबाबत शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.
पोलिसांनी धनंजय कुलकर्णीला अटक केली आहे. या प्रकरणावर भाजपच्या कोणत्याही नेत्यांकडून प्रतिक्रिया आलेली नाही. पण, या प्रकरणी पोलिसांवर दबाव येण्याची शक्यता काही विश्वसनीय सूत्र बोलून दाखवत आहेत.

Post a Comment