0
हेल्मेट सक्तीच्या विरोधात गेल्‍या आठवडाभरापासून शहरातील विविध भागात राजकीय पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. शिवसेनेच्या वतीने ३ जानेवारी रोजी हडपसर भागात अत्यंयात्रा देखील काढण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातील विविध राजकीय संघटना आणि हेल्मेट विरोधी कृती समितीच्या वतीने हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ मंगळवारी स्मशानभूमीत दशक्रिया विधी करण्यात आला.

हेल्मेट, दारूच्या बाटलीत चहा, वडा पाव, भेळ अशा वस्तू या दशक्रिया विधी दरम्यान ठेवण्यात आल्‍या होत्‍या. हेल्मेट विरोधी कृती समितीचे संयोजक आणि माजी महापौर अंकुश काकडे, शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, भाजप नेते संदीप खर्डेकर, नगरसेवक विशाल धनवडे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, काँग्रेस सरचिटणीस संदीप मोरे तसेच शहरातील विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार महादेव बाबर म्हणाले, मागील आठवडाभरापासून पुणे वाहतूक पोलिसांकडून कायद्याचा धाक दाखवत हेल्मेट सक्ती केली जात आहे. ही निषेधार्थ बाब असून पुणे शहराच्या वाहतुकीचा वेग लक्षात घेता. हेल्मेट सक्ती राबविणे चुकीचे आहे.  वाहतूक पोलिसांनी ही कारवाई मागे न घेतल्यास भविष्यात आधिक तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Post a Comment

 
Top