0
मुंबई 

विवाहामुळे दीपिका पदुकोण व रणवीर सिंग ही जोडी गेल्या महिन्यापासून चर्चेत आहे. अशातच ही ‘रिअल लाईफ’मधील जोडी डायरेक्टर कबीर खान यांच्या आगामी ‘83’ या चित्रपटात ‘रिल लाईफ’मध्ये दिसणार असल्याचे बोलले जात होते. हा चित्रपट 1983 साली भारताने जिंकलेल्या क्रिकेट ‘वर्ल्डकप’ स्पर्धेवर आधारित आहे. यामध्ये रणवीर सिंग हा कपिलदेवच्या भूमिकेत दिसणार आहे. असेही समजते की, कपिलदेव यांच्या पत्नीच्या भूमिकेसाठी दीपिकाला ऑफर देण्यात आली होती. मात्र, दीपिकाने ‘83’ मध्ये काम करण्यास स्पष्ट नकार दिल्याचे समजते.

कबीर खान यांच्या आगामी ‘83’ या चित्रपटातील भूमिकेत करण्यासारखे काहीच खास नाही, असे दीपिकाला वाटते. उपलब्ध माहितीनुसार ‘83’ या चित्रपटाची कहाणी तत्कालीन भारतीय संघाचा कर्णधार कपिलदेव आणि क्रिकेट ‘वर्ल्डकप’वर आधारित आहे. तसेच दीपिकाला जी भूमिका ऑफर करण्यात आली होती, ती फारच कमी अवधीची आहे. यामुळेच तिने हा चित्रपट करण्यास नकार दिला. केवळ रणवीर आहे म्हणून चित्रपट साईन करण्यास दीपिका इच्छुक नाही.

तसे पाहिल्यास दीपिकाचा निर्णय योग्यच आहे. कारण या अभिनेत्रीला असे वाटते की, सिनेप्रेमी दीप-वीरला सिल्व्हर स्क्रिनवर पाहण्यास उत्सुक असली तरी ते ज्यावेळी पैसे खर्च करून तिकीट खरेदी करतील आणि चित्रपट जर त्यांना पसंत पडला नाही, तर ते नाराज होतील. ‘बाजीराव मस्तानी’ व ‘रामलिला’ या चित्रपटात दोहोंच्या भूमिका बरोबरीने होत्या. यामुळेच प्रेक्षकांना हे चित्रपट आवडले होते. दीपिका सध्या मेगना गुलझार यांच्या ‘छपाक’ या चित्रपटात व्यस्त आहे.

Post a Comment

 
Top