0
अमेरिका आणि हाँगकाँगने नवीन कायद्याला विरोध केला आहे.

बीजिंग - नवीन वर्षात चीनने कर बुडव्यांवर लगाम लावण्यासाठी कठोर नियम लागू केला आहे. चीनच्या कर वसूली प्राधिकरणाने आणलेल्या नियमानुसार, कर नाही भरल्यास कुणालाही देश सोडता येणार नाही. हा नियम उद्योजकांसाठीच नव्हे, तर सामान्य नागरिकांना सुद्धा लागू झाला आहे. या नियमात सुरुवातीला असे उद्योजक येतील ज्यांच्यावर 1 लाख युआन (10.26 लाख भारतीय रुपये) एवढे कर बाकी आहे. अशा लोकांचा संपूर्ण तपशील जसे की आयडी कार्ड, बँक अकाउंट नंबर आणि पासपोर्ट डिटेल्स कर प्राधिकरणाच्या डेटाबेसमध्ये असतील आणि त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल. या डेटाबेसमध्ये पोलिस, बँक, इमिग्रेशन, पासपोर्ट, एअपोर्ट आणि सी-पोर्ट अशा विविध विभागांना सामिल केले जाणार आहे. त्यांच्या परवानगीशिवाय हे लोक देश सोडू शकणार नाहीत.


परदेशी नागरिकांनाही भुरदंड
नवीन कायद्यानुसार, एखादा परदेशी उद्योजक किंवा कर्मचारी आपल्या उद्योग किंवा नोकरीसाठी चीनमध्ये 183 दिवसांपेक्षा जास्त थांबत असेल तर त्याची कमाई करपात्र ठरले. यासोबतच चिनी नागरिकांना सुद्धा परदेशात झालेल्या कमाईतून कर भरावाच लागेल. परदेशी नागरिकांसाठी चीनने लागू केलेल्या कायद्यातील या तरतूदीला अमेरिका आणि हाँगकाँगने विरोध केला आहे. चीनची लोकसंख्या 138 कोटी आहे. त्यातून 2.8 कोटी लोकच कर भरतात. अशात टॅक्स अधिकारी जास्तीत-जास्त लोकांना कराच्या पल्ल्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
In China tax evaders can not leave country according to new law

Post a Comment

 
Top