0
मुंबई :

मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात केली आहे.  तिच्या 'पाटील' या चित्रपटाचे शो पश्चिम महाराष्ट्रात हाऊसफुल होत आहेत. तसेच ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही ती झळकणार आहे.भाग्यश्री लवकरच तेलुगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करणार आहे. हा कॉमेडी हॉरर सिनेमा असून नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.

'चिकती गदीलो चिताकोटुडू' चित्रपटात मित्रमंडळी फिरण्यासाठी एका ठिकाणी जातात. ते ज्या ठिकाणी वास्तव्यास थांबतात. त्या ठिकाणी भूत असते आणि मग त्यांना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो, यावर आधारीत या चित्रपटाची कथा आहे.  भाग्यश्री मोटेने सोशल मीडियावर 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटाचा पोस्टर व टीझर शेअर करून लिहिले की, माझ्या नवीन वर्षाची सुरूवात या बातमीने झाली. माझे तेलुगूमध्ये पदार्पण असलेला चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू'चा टीझर प्रदर्शित झाला आहे.

Post a Comment

 
Top