0
कुमारस्वामी यांनी काँग्रेसचे आमदार व मंत्री सी. पुट्टारंगा शेट्टी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

बंगळुरू- कर्नाटकमध्ये जेडीएस- काँग्रेस आघाडीत सर्व काही ठीकठाक असल्याचे दिसत नाही. मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. काँग्रेस आमदारांनी सीमा ओलांडली असल्याचे कुमारस्वामी म्हणाले. कुमारस्वामी यांनी काँग्रेसचे आमदार व मंत्री सी. पुट्टारंगा शेट्टी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. शेट्टी यांनी त्यांच्यासाठी सिद्धरामय्याच मुख्यमंत्री असल्याचे म्हटले होते.

कुमारस्वामी म्हणाले, काँग्रेसच्या नेत्यांनी या मुद्द्यावर विचार केला पाहिजे. ते हे सर्व सुरू ठेवू इच्छित असतील तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. या लोकांनी मर्यादा ओलांडली आहे. यामुळे त्यांचेच नुकसान होईल. काँग्रेस नेत्यांनी आपले आमदार सांभाळले पाहिजेत. शेट्टी यांच्या वक्तव्यानंतर कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी नाराजी व्यक्त केली. राव म्हणाले, काँग्रेस आमदाराचे अशी वक्तव्य अस्वीकार्ह आहे. त्यांच्या विधानाचा मी निषेध करतो व त्यांना कारणा दाखवा नोटीस जारी करतो. कुमारस्वामी यांच्या धमकीनंतर उपमुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते जी. परमेश्वर म्हणाले, काँग्रेस मुख्यमंत्री म्हणून कुमारस्वामींवर समाधानी आहेत.


मीडिया वाद उभा करत आहे : सिद्धरामय्या
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रसारमाध्यमे उगाच वाद निर्माण करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सरकारमध्ये काहीच समस्या नाही. सरकार बळकट आहे. मी स्वत: कुमारस्वामी यांच्याशी बोलेन. आपल्याला मुख्यमंत्री व्हायचे नसल्याचे ते म्हणाले. संक्रांतीनंतर कर्नाटकात नवीन सरकार येईल, असे राज्यातील भाजपच्या एका नेत्याने सांगितले होते.
Tension in Aghadi, Congress trying to cross limit: Chief Minister Kumarswami

Post a comment

 
Top