0
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा लातूरमध्ये येणार आहे.

लातूर- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पहिल्यांदाच लातूरमध्ये येत असून त्यांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. औसा रस्त्यावरील थोरमोटे लाॅन्स येथे हा कार्यक्रम होणार असून शहा एका खासगी थ्री स्टार हॉटेलमध्ये मुक्कामी राहणार आहे. त्यांना जेवणासाठी लातूरमधील स्थानिक पदार्थांचा काही खास मेन्यू करता येईल का, हाच पदार्थ बैठकीसाठी आलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांना पुरवता येईल का याविषयीचेही नियोजन सुरू आहे.


आगामी लोकसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा रविवारी लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची दिवसभर बैठक घेणार आहेत. गेल्या साडेचार वर्षात सरकारने राबवलेल्या योजना, झालेली विकास कामे, संघटनात्मक पक्ष बांधणी या बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना या बैठकीचा तातडीचा निरोप देण्यात आल्यानंतर ते बुधवारीच पहाटे लातूरमध्ये दाखल झाले. बैठकीला येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या, त्यासाठी कोणते ठिकाण योग्य राहील याची पाहणी करून स्थळ अंतिम करण्यात आले. सायंकाळी निलंगेकर यांनी बैठकीच्या स्थळाची पाहणी केली.
Amit Shah visit latur

Post a Comment

 
Top