0
लोणंद : 

साखरवाडी येथील न्यू शुगर फलटण वकर्स या साखर कारखान्याने मागील गळीत हंगामाचे अद्याप ऊस बिल दिले नाही. या निषेधार्थ खंडाळा व फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाळासाहेब शेळके व पंकज शिंदे यांचे नेतृत्वाखाली ऊसाचे बील त्वरीत मिळावे या मागणीसाठी सोमवारी सकाळी सालपे ता. फलटण येथे लोणंद - सातारा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन  केले. आंदोलनात मोठया संख्येने खंडाळा व फलटण तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते. जोपर्यत ऊसाचे बील मिळत नाही तोपर्यत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येणार असल्या इशारा  पंकज शिंदे व बाळासाहेब शेळके यांनी दिला.

साखरवाडी साखर कारखान्याने मागील हंगामाचे ऊस बिल दिले नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. ऊस बिलाच्या मागणीसाठी फलटण , खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्याचे वतीने सालपे येथे रास्ता रोको करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी सालपे येथील श्री भैरवनाथ मंदिरामध्ये जमा झाले. त्या ठिकाणी बाळासाहेब शेळके व पंकज शिंदे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मोर्चाने शेतकरी लोणंद - सातारा रस्थावरील सालपे बस स्टॉप जवळ येऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Post a Comment

 
Top