नवी दिल्ली – लोकसभा अध्यक्ष आणि भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांनी राहुल गांधी यांना राजकारण करता येत नसल्याची खळबळजनक टीका केली. अगदी कमी कालावधी लोकसभा निवडणुकांना उरला असल्यामुळे राजकीय हालचालींनी आता उधाण आलेले दिसते. एकमेंकावर अनेक पक्ष टीकेची झोड उठवत आहेत. त्यातच सुमित्रा महाजन यांच्या या वक्तव्याची भर पडली आहे.
पूर्व उत्तर प्रदेश येथे काँग्रेसने प्रियंका गांधी वाड्रा यांना प्रभारी नियुक्त केले आहे. काँग्रेसचा लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हा मास्टर स्ट्रोक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. पण या घटनेला सुमित्रा महाजन यांनी राहुल गांधी यांचे अपयश असल्याचे म्हटले. प्रियंका या चांगल्या महिला नेत्या असल्याचे राहुल गांधी यांनीही स्विकारले आहे. यावरून हे सिद्ध होते की ते राजकारण एकट्याने कधीच करू शकत नाहीत, असे रोखठोक वक्तव्य त्यांनी केले.

Post a Comment