मुंबई :
आगामी लोकसभेच्या निवडणुका जवळ येतील तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच भाजप आणि शिवसेनेच्या युतीचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही पक्ष स्वबळाची भाषा करत आहेत. याला भर म्हणून की काय लातूर येथे झालेल्या बैठकीत ‘सोबत आले तर ठिक नाही तर पटक देंगे या’’ अमित शहा यांच्या वक्तव्यावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘‘शिवसेनेला पटकवणारा अजून जन्माला आला नाही आणि येणारही नाही. असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘आम्हाला कोणी लेचेपेचे समजू नका. कित्येक लाटा आल्या आणि गेल्या. भरती आणि ओहोटीला आम्ही घाबरत नाही. लाटेची आम्ही वाट लावतो. काही जण काम न करता स्वत:ची टिमकी वाजवत बसतात.’’ असा निशाना पंतप्रधान मोदींवर साधला.
‘‘विश्वास गमावला तर युद्ध जिंकणे अशक्य होते, सरकारने राम मंदिराचा मुद्दा सुद्धा जुमलाच बनवला आहे. जो पक्ष देव, देश आणि धर्म यासाठी लढेल तो पक्ष जिंकल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वासही यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी पीक विमा योजनेवरही टीका केली. ‘‘पंतप्रधान पीक "फसाल" योजना’’ अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी या योजनेची खिल्ली उडवली. ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेली व्यक्ति आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल तर ८ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करा, अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.

Post a Comment