राजच्या संमतीने मांजरेकर घेणार काँग्रेसची उमेदवारी!
मुंबई- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. दोन्ही पक्षांतील लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अहमदनगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नंदुरबार, यवतमाळ, औरंगाबाद आणि रावेर या सहा जागांसाठी या दोन्ही पक्षांत अजून चर्चा सुरू आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या कोल्हापूर, रायगड, उस्मानाबाद, परभणी आणि बीड या मतदारसंघांत एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक असल्याने उमेदवारीसाठी पक्षांतर्गत जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या या पाचही मतदारसंघांतील इच्छुकांशी स्वत: शरद पवारांनी चर्चा केली. या चर्चेअंती कोल्हापुरातून विद्यमान खासदार धनंजय महाडिक, तर रायगडमधून सुनील तटकरे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळाल्याचे वृत्त आहे.
विश्वसनीय सूत्रांनुसार, रायगडमध्ये सुनील तटकरे यांचे नाव निश्चित झाले आहे. तर कोल्हापुरातून धनंजय महाडिक यांच्या नावाला पक्षाची पहिली पसंती आहे. रायगडमधून भास्कर जाधव यांनीही उमेदवारी मागितली होती. मात्र, पवारांनी भास्कर जाधव यांची समजूत काढून तटकरे यांचे नाव निश्चित केल्याचे समजते.
लोकसभेसाठी जागावाटप
कोल्हापूर, रायगड, उस्मानाबाद, परभणी, बीडमध्ये एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक असल्याने राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच.
उस्मानाबादेतून सोपल, पद्मसिंह पाटील उत्सुक
उस्मानाबादमधून माजी मंत्री दिलीप सोपल, पद्मसिंह पाटील व राणा जगजितसिंह इच्छुक असून बीडमधून जयदत्त क्षीरसागर, अमरसिंह पंडित व बजरंग सोनवणे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. परभणीतून बाबा जानी दुर्राणी व विजय भांबळे इच्छुक आहेत.

उमेदवारी एका पक्षाची पण संमती दुसऱ्याच नेत्यांची, असा यशस्वी राजकीय पट प्रसिद्ध दिग्दर्शक, सिने कलाकार महेश मांजरेकर यांनी साधला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत मांजरेकर काँग्रेसमधून निवडणूक लढवतील. परंतु यासाठी त्यांनी संमती घेतली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची. 'राज माझा चांगला मित्र आहे आणि अशोक चव्हाणांसोबत तर ४२ वर्षांची मैत्री असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने मनसेचा उमेदवार नसलेल्या 'मुंबईबाहेरील' मतदारसंघातून लढणार आहे', असे मांजरेकर यांनी सांगितले.
मांजरेकर यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता ते अशोक चव्हाण यांच्यासोबत दौऱ्यात दिसू लागले आहेत. कलाकार म्हणून बरीच वर्ष काम केल्यावर किमान दोन टर्म लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी राजकारणात प्रवेश केला असल्याचे ते म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीत ते 'मनसे'चा उमेदवार नसलेल्या मतदारसंघातून उभे राहतील. हा मतदारसंघ 'मुंबईबाहेरचा' असल्याचे सूचक विधानही त्यांनी केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यावरच आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचेही ते म्हणाले. सबसिडीपेक्षा सुविधा महत्त्वाच्या असल्याचे ते म्हणाले. पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये एक थिएटर यासारखे धोरणात्मक निर्णय घडवून आणण्याचा माझा मानस आहे. फिल्म सिटीसारखी शासनाची खूप मोठी जागा आहे, अशा अनेक योजना मनात असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment