गव्हर्नन्समधील त्रुटींची व्हिसलब्लोअरची तक्रार
नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी औषध कंपनी असलेल्या सन फार्माच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्समधील त्रुटींविरोधात एका व्हिसलब्लोअरने 'सेबी'कडे १७२ पानी तक्रार केली आहे. २०१४ ते २०१७ या कालावधीत आदित्य मेडिसेल्स लिमिटेड (एएमएल) कंपनीने सुरक्षा रिअॅल्टी फर्मसोबत ५,८०० कोटींचा व्यवहार केला. ही कंपनी सन फार्माचे सहप्रवर्तक सुधीर वालिया यांची आहे. वालिया सन फार्माचे अब्जाधीश संस्थापक व एमडी दिलीप संघवी यांचे नातलग आहेत, असे तक्रारीत नमूद केले आहे. एलएमएल ही सन फार्माची वितरक कंपनी आहे.
२०१७-१८ च्या वार्षिक अहवालात सन फार्माने एएमएल कंपनीला रिलेटेड पार्टी म्हणून दाखवले आहे. यात दिलीप संघवी यांची ५९.२७ % भागीदारी होती. मीडिया रिपोर्टसनुसार, सन फार्माने ११ वर्षांपर्यंत एएमएलबाबत ही माहिती प्रकाशित केली. म्हणजे २००६ पर्यंत एएमएलमध्ये संघवी यांची भागीदारी होती. सन फार्माच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये त्रुटी असल्याच्या दोन महिन्यांत दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. डिसेंबरमध्ये एका व्हिसलब्लोअरने आरोप केला की, संघवी हे वालिया, धर्मेश दोशी यांच्यासोबत गैरव्यवहारात सहभागी होते. या आरोपानुसार, सन फार्मा कंपनीला 'फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बाँडस'मधून (एफसीसीबी) जे पैसे मिळाले होते, ते संघवी, दोशी व वालिया यांनी दुसऱ्या कंपनीत गुंतवले. दोशीचे नाव २००१ मधील शेअर बाजारात झालेल्या केतन पारेख घोटाळ्यातही समोर आले होतेे.
असे आहेत आरोप
- कंपनीच्या दोन संचालकांचा ५,८०० कोटींचा व्यवहार
- सन फार्माची वितरक आदित्य मेडिसेल्स व सुरक्षा रिअॅल्टी यांच्यात ५,८०० कोटींचा व्यवहार झाला. आदित्य मेडिसेल्समध्ये संघवी यांची ५९.२७ % भागीदारी सन फार्माचे सह-प्रवर्तक सुधीर वालिया यांची सुरक्षा रिअॅल्टी ही कंपनी सन फार्माचे संस्थापक संघवी यांचे वालिया नातलग.
शेअर गडगडले
- या आरोपांमुळे गुंतवणूकदारांनी सन फार्माच्या शेअरची विक्री सुरू केली. दिवसभरात बीएसईत कंपनीचे शेअर १२.१२ टक्के घसरून ३७४.४० रुपयांपर्यंत आले. गेल्या सहा वर्षांतील या शेअरच्या किमतीचा हा नीचांक मानला जातो. फेब्रुवारी २०१३ नंतर हा सर्वात कमी भाव आहे. सायंकाळी बाजार बंद होताना शेअर ८.५२% घसरून ३९०.७५ रुपयांवर बंद झाला.

Post a Comment