रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या धमाकेदार सलामीनंतर विराट, रायडू, धोनी आणि केदार जाधवने दिलेल्या योगदानाच्या जोरावर भारताने न्यूझीलंड समोर ३२५ धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून रोहित शर्माने ८७, शिखर धवनने ६६, विराटने ४३, रायडूने ४७ धोनीने ४८ धावा केल्या.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामीच्या जोडीने विराटचा हा निर्णय योग्य ठरवत आक्रमक सुरुवात केली. सुरवातीच्या काही षटकात आक्रमणाची धुरा शिखर धवनने आपल्या खांद्यावर वाहिली. दोघेही आपल्या अर्धशतकाजवळ पोहचल्यावर रोहितने आपला गिअर बदलला. त्याने तुफान फटकेबाजी करत भारताला नाबद शतकी सलामी दिली. दरम्यान, शिखरनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. पण, त्याला या अधर्शतकाचे रुपांतर मोठ्या धावसंख्येत करता आले नाही. तो ६६ धावा करुन माघारी परतला.
रोहितने एका बाजूने तुफान फटकेबाजी सुरुच ठेवली होती. त्यामुळे भारताने २५ व्या षटकातच दिडशतक पूर्ण केले. रोहित आजच्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असतानाच लोकी फर्गुसनचा अखूड टप्यावरील चेंडू पूल मारण्याच्या नादात ग्रँडहोमेकडे झेल देत बाद झाला. त्याने ३ षटकार ९ चौकारांच्या मदतीने ९६ चेंडूत ८७ धावा केल्या. रोहित बाद झाल्यावर कर्णधार विराट कोहलीने भारताच्या डावाची सुत्रे आपल्या हातात घेतली.
रोहित बाद झाल्यावर विराट कोहली आणि अंबाती रायडूने भारताची धावगती कमी होऊ दिली नाही. दोघांनीही भारताला ३५ च्या षटकातच २०० च्या पार पोहचवले. पण, विराट ४३ धावांवर बाद झाल्यावर भारताची धावगती मंदावली. काही षटके झाल्यावर अंबाती रायडूही बाद झाला. त्यालाही अर्धशतक पूर्ण करता आले नाही. त्याला ४७ धावांवर फर्गुसनने बाद केले. रायडू बाद झाला त्यावेळी भारताच्या ४५ षटकात २७१ धावा झाल्या होत्या.
अखेरच्या ५ षटकात महेंद्रसिह धोनी आणि केदार जाधवने तडाखेबाज फलंदाजी करत भारताला ३२४ धावांपर्यंत पोहचवले. ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या एकदिवसीय मालिकेत फॉर्ममध्ये परतलेल्या धोनीने याही सामन्यात १ षटकात आणि ५ चौकारांच्या मदतीने ४८ धावांची नाबाद खेळी केली. त्याला केदार जाधवने १० चेंडूत २२ धावांची छोटी पण, आक्रमक खेळी करुन चांगली साथ दिली. न्यूझीलंकडून फर्गुसन आणि बोल्ट यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
*किवींसमोर ३२५ धावांचे आव्हान
*भारताला तिसरा धक्का, कर्णधार विराट कोहली ४३ धावा करुन बाद
*भारताच्या ३५ षटकात २ बाद २०७ धावा
*रो-हिट आक्रमक पवित्र्यात; भारताच्या २९ षटकात १ बद १७२ धावा
*भारताला पहिला धक्का; शिखर धवन ६६ धावा करुन बाद
*रोहित शर्माचे अर्धशतक; भारताच्या १९ षटकात बिनबाद १०० धावा
*भारताच्या १२ षटकात बिनबाद ६६ धावा
भारताच्या ८ षटकात बिनबाद ४८ धावा
भारताच्या संघात कोणताही बदल नाही
भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

Post a Comment