सिलाँग :
मेघालयातील पूर्वेकडील भागातील जैंतिया हिल्स जिल्ह्यातील अवैध कोळसा खाणीत अडकलेल्या १५ खाण कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. १३ डिसेंबरला हे १५ खाण कामगार खोल खाणीत आडकलेले होते. त्यानंतर तब्बल ३४ व्या दिवशी म्हणजे गुरुवारी (दि.१७) पहिला मृतदेह अवैध कोळासा खाणीतून बाहेर काढण्यात आला आहे. या बचाव कार्यादरम्यान भारतीय नौदलास जवळजवळ २१० फूट खोल खाणीत या खाण कामगाराचा मृतदेह मिळाला आहे. अन्य खाण कामगारांना शोधण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. या घटनेमुळे खाण कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
या बचाव कार्यादरम्यान खाणीतील खोल खड्डयातून पाणी बाहेर काढण्यात येत आहे. या खड्डयात लितेन नदीचे पाणी गेल्याने १५ खाण कामगार आतमध्ये अडकले होते. ३४ दिवसानंतर एका खाण कामगाराला बाहेर काढण्यात यश आले आहे.
वाचा : बंदी झुगारून तामिळनाडूत 'जलिकट्टू'ची धूम
दरम्यान, याच जिल्ह्यातील केसान गावातील खाणीत १३ डिसेंबर २०१८ रोजी १५ खाण कामगार अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. ३७० फूट खोल खड्यातून पाणी बाहेर काढण्यात येत आहे. अनेक कामगारांचे रॅट होल खाणीमध्ये मृत्यू होत असल्याने भारताच्या पर्यावरण न्यायालयाने २०१४ मध्ये रॅट होलमध्ये खाण उत्खननावर बंदी घातली आहे.
भारतीय हवाई दल (Indian Air Force), भारतीय नौदलाचे (Indian Navy) पाणबुडी तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) या खाण कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच ओडिशा अग्निशमन दलासह गुहेत अडकलेल्या थायलंड फुटबॉल संघाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव मोहिमेत महत्त्वाच्या साधनाचां पुरवठा करणारी महाराष्ट्रातील किर्लोस्कर कंपनीची टीमदेखील या ठिकाणील बचाव कार्यात सहभागी झाली आहे.
वाचा : पत्रकार हत्याकांड प्रकरणी राम रहीमला आज शिक्षा
सर्वोच्च न्यायालयाकडून मेघालय सरकारला मागच्या आठवड्यात १३ डिसेंबरला अवैध कोळसा खाणीत अडकलेल्या १५ खाण कामगारांना बाहेर काढण्यात दिरंगाई करत असल्याचे कारणावरुन खडेबोल सुनावले होते. त्यांना वाचवण्यासाठी जलद आणि प्रभावी अभियान राबविण्यात यावे कारण हा त्यांच्या जीवण मरणाचा प्रश्न असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले होते.

Post a Comment