0
महाड :

देशात आणि राज्यात सत्ताबदल करण्यासाठी सर्वपक्षीय आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे, भाजपविरोधी वातावरण तयार केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या निर्धार परिवर्तन यात्रेला गुरुवारी रायगडमधून सुरुवात झाली. सकाळी ८ वाजता पाचाड येथील राजमाता जिजाबाई यांचे समाधीस्थळ आणि किल्ले रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीला नतमस्तक होऊन राष्ट्रवादीच्या नेत्‍यांनी  परिवर्तन यात्रेला सुरुवात केली.

संप चिघळण्याची शक्यता; बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

या परिवर्तन यात्रेमध्ये  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जेष्ठ नेते छगन भुजबळ, सुनिल तटकरे, दिलीप वळसे-पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह अन्य नेते सहभागी झाले आहेत. ही निर्धार परिवर्तन यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये जाणार असून राज्यातील जनतेला सरकारच्या मनमानी कारभाराची जाणीव करून देऊन जनतेचे सहकार्य घेणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिली.

Post a Comment

 
Top