0
बुलंदशहर हिंसाचार प्रकरणातील मुख्य संशयिताला पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली. शिखर अग्रवाल असे अटक करण्यात आलेल्‍या संशयिताचे नाव असून, तो भारतीय जनता युवा मोर्चाचा  सदस्‍य आहे.उत्‍तर प्रदेशमधील हापूर जिल्ह्यातून अग्रवाल याला ताब्‍यात घेतले आहे. पोलिस त्‍याची चौकशी करीत असून, त्‍याला आजच स्थानिक कोर्टात हजर करण्यात येणार असल्‍याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (बुलंदशहर शहर) अतुल कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले.

बुलंदशहर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी या आधी मुख्य तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिस निरीक्षक सिंह यांच्यावर कुऱ्हाडीने वार करणारा कलुआ, कॅब चालक प्रशांत नत्त, स्थानिक बजरंग दलचा नेता योगेश राज आणि  पोलिस निरीक्षकावर गोळी झाडून हत्या केल्याचा आरोप असलेल्या जितेंद्र मलिक यांनी पोलिसांनी अटक केली आहे. अग्रवालसह या चौघांच्या अटकेमुळे हिंसाचार प्रकरणी अटक केलेल्या संशयितांचा आकडा आता ३५ वर पोहचला आहे. 

Post a Comment

 
Top