0
उज्जैन (मध्य प्रदेश)

मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील रामगड गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात १२ जण ठार तर २ गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली आहे.
सोमवारी रात्री दोन गाड्या एकमेकाला धडकल्या. हा अपघात इतका भीषण होता की एक कार ५० मीटर दूरवर जाऊन पडली. यात १२ जणांचा मृत्यू झाला असून त्यात एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे. तसेच या अपघातात एका भाजप पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अधिक मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात व्हॅन आणि कारमध्ये झाला आहे. लग्नाचा कार्यक्रम संपल्यानंतर गाडीमधून लोक घरी परतत होते. या दरम्यान रात्री १ वाजता समोरून येणाऱ्या दुसऱ्या गाडीने तिला धडक दिली. त्यात एका गाडीतील १२ जणांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या गाडीमधील लोक एअरबॅग्जमुळे बचावले आहेत.     

Post a Comment

 
Top