0
निवडणुकांमध्ये मतदारांनी ‘नोटा’ला मतदान न करता सर्वोत्तम उमेदवाराला मतदान करावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी आपले मत व्यक्त करताना संघाला खडेबोल सुनावले आहेत.

‘लोकशाहीत बोलण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र, नोटाला मतदान करू नका, असे खुलेआम बोलण्यापेक्षा संसदेत जाऊन विरोध केला पाहिजे आणि काय बदल करावा हे सांगितले पाहिजे. एवढेच नाही तर निवडणुकीत नोटाला सर्वाधिक मते पडली तर फेरनिवडणूक घ्यावी. म्हणजे देशात पारदर्शकता येईल. केवळ विरोध करून चालणार नाही’, असेही ते म्हणाले.

‘नोटा हा पर्याय निवडणूक आयोगाने सुचवलेला असून निवडणूक आयोग ही संवैधानिक संस्था आहे. त्यामुळे अशा संस्थेला बाहेरून विरोध करण्यापेक्षा संसदेत जावे’, असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top