0
धारुर ठाण्यातून आरोपी पसार होण्याच्या घटना सातत्याने घडतात. गतवर्षी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी पसार झाला होता.

धारूर (जि. बीड) - थंडीने कुडकुडलेला आरोपी मध्यरात्री पोलिसांनी कोठडीबाहेर काढून शेकोटीसमोर बसवला. मात्र, संधी साधून त्याचे चक्क धूम ठोकली. हे प्रकरण 'शेक'ण्याची चिन्हे दिसताच पोलिसांनी ७ तास शोधमोहीम राबवून सकाळी आरोपीला पुन्हा पकडले. बीड जिल्ह्यातील धारूरमध्ये ही घटना घडली. पिंपरवाडा (ता. धारूर) येथील धनराज डोंगरेने गावातीलच एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. पोलिसांनी आरोपीला पकडले. या प्रकरणात नंतर बलात्काराची तक्रारही दाखल झाल्याने २९ डिसेंबरला पोलिसांनी धनराजला अटक केली. कोर्टाने ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. रविवारी रात्री ८ वाजेपासून धनराजने अति थंडी वाजत असल्याचे पोलिसांना सांगितले. गार्ड ड्यूटीवरील गिरी यांनी रात्री दीडपर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष केले. अतिथंडीने धनराज उडत असल्याचे पाहून गिरींनी त्याला कोठडीबाहेर काढून ठाण्यासमोर पेटवलेल्या शेकोटीजवळ बसवले. काही वेळाने गिरींना गुंगारा देत डोंगरेंने पळ काढला. या घटनेला पोलिस निरीक्षक जाधव यांनी दुजाेरा दिला.

तीन पथके, सात तास शोध : दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांनी मध्यरात्री ठाण्यात धाव घेत ३ पथके तपासासाठी रवाना केली. धनराजला सोमवार सकाळी ८.३० वाजता आसोला येथे नातेवाइकाच्या घरून त्याला ताब्यात घेण्यात आले.

यापूर्वीही घटना : धारुर ठाण्यातून आरोपी पसार होण्याच्या घटना सातत्याने घडतात. गतवर्षी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी पसार झाला होता. यानंतर एका पोलिस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाईही झाली होती.
absconded accused recovered

Post a Comment

 
Top