दुष्काळाचा 'बळी'राजा नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नापिकी, कर्जाचा डोंगर, शेतमालाच्या कोसळत्या दराने चिंता
मालेगाव- दुष्काळ आणि नापिकीमुळे कर्जाचा वाढता डोंगर, दररोज कोसळणारे शेतमालाचे दर, जनावरांचा व्याप, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता आणि त्यातच रास्त बाजारभावाच्या प्रतीक्षेत शेतात साठवलेल्या कांद्यालाही फुटलेले कोंब पाहून नैराश्याच्या खाईत लोटल्या गेलेल्या ज्ञानेश्वर दशरथ शिवणकर (३५) या शेतकऱ्याने शुक्रवारी सकाळी खळ्यातील कांद्याच्या ढिगाऱ्यावरच विष प्राशन करून आत्महत्या केली. नाशिक जिल्ह्यातील कंधाणे (ता. मालेगाव) गावी ही हृदयद्रावक घटना घडली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुलगे, दोन मुली असा परिवार आहे. गेल्या दोन दिवसांत तालुक्यातील ही तिसरी शेतकरी आत्महत्या आहे.
कंधाणे येथील शिवणकर कुटुंबास सहा एकर शेती आहे. यंदा यातील दोन एकर क्षेत्रात लाल कांद्याची लागवड केली होती. दुष्काळी परिस्थितीतही विहिरीच्या उपलब्ध पाण्यावर मोठ्या कष्टाने लाल कांदा पिकवला होता. मात्र, पिकवलेल्या कांद्याला अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने केलेला खर्चही वसूल झाला नाही. १३० ते २०० रुपये क्विंटल अशा कवडीमोल भावाने कांद्याची विक्री करावी लागल्याने खर्चही वसूल झाला नव्हता. त्यातच आई मथुराबाई व वडील दशरथ यांच्या नावे घेतलेले दीड लाखाचे पीक कर्ज कसे फेडायचे, याची विवंचना कुटुंबातील कर्त्या ज्ञानेश्वरला सतावत होती. याच विवंचनेतच शुक्रवारी सकाळी ज्ञानेश्वर बैलगाडी जुंपून शेतात गेला.
शेतात विक्रीसाठी काढून ठेवलेल्या कांद्याला फुटलेले कोंब बघून हा उरलासुरला कांदाही वाया गेल्याने तो खिन्न झाला. अशा निराश मन:स्थितीतच ज्ञानेश्वरने विषारी औषध प्राशन करून कांद्याच्या ढिगाऱ्यावरच अखेरचा श्वास घेतला. काही वेळाने शेजारी शेतकरी शेतात आले असता त्यांना हे दृश्य दिसले. हा प्रकार कळताच कुटुंबीयांनीही घटनास्थळी धाव घेऊन एकच आक्रोश केला.
दीड महिन्यापासून कांदा पडून
शिवणकर यांच्या शेतात ३० क्विंटल कांदा पडून आहे. दीड महिन्यापूर्वी या कुटुंबाने कांदा काढून ठेवला. कोसळत्या बाजारभावामुळे साठवलेल्या कांद्याला कोंब फुटून तो खराब झाला. सध्याच्या बाजारभावात कांदा विक्रीसाठी नेणेही खर्चिक ठरणारे असल्याने कांदा फेकून देण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
कर्जमाफीचा लाभ नाही
मृत ज्ञानेश्वरच्या नावावर एक एकर शेतजमीन आहे. वडील व आईच्या नावे असलेल्या प्रत्येकी एक हेक्टर क्षेत्रावर दीड लाखाचे पीक कर्ज आहे. मागील कर्ज या कुटुंबाने नियमित फेडले आहे. त्यामुळे त्यांना सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. दीड लाखाच्या कर्जाव्यतिरिक्त त्यांच्यावर हातउसनवारीचे कर्जही असल्याची माहिती कुटुंबातील सदस्यांनी दिली.
वर्षात १८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मागील वर्षभरात मालेगाव तालुक्यात १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नवीन वर्षाची सुरुवातही तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी झाली आहे. महसूलने जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवलेल्या शेतकरी आत्महत्या प्रस्तावांपैकी नऊ अपात्र तर चार प्रस्ताव पात्र ठरले आहेत. पाच प्रस्तावांची सुनावणी सुरू आहे.
सर्व शक्यतांची पडताळणी
ज्ञानेश्वरच्या कुटुंबांतील सदस्यांनी काही आरोप केल्याचा व्हिडिआे पोलिसांना मिळाला. त्याअनुषंगाने पोलिसांनी कुणाच्या जाचास कंटाळून आत्महत्या केली का, या दिशेनेही तपास सुरू केला आहे. ज्ञानेश्वरचा भाऊ कन्हैया याने आत्महत्येचे कारण कांद्याचे कोसळणारे बाजारभाव असल्याचे सांगितले. घटनास्थळी विषाची बाटली किंवा अन्य संशयास्पद वस्तू पोलिसांना आढळली नाही.
मालेगाव तालुक्यात २५ हजार मेट्रीक टन कांदा मार्केटच्या प्रतीक्षेत
मालेगाव तालुक्यात गेल्या वर्षाचा (मार्च २०१८ नंतरचा उन्हाळ) सुमारे २५ हजार मेट्रिक टन कांदा रास्त बाजारभावाच्या प्रतीक्षेत अद्याप चाळीतच आहे. सध्या खरीप प्रारंभी व उशिरा खरीप अशा २० हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. लाल कांदा अडीच ते पावणेतीन महिन्यांत तयार होतो. मार्च व एप्रिल २०१९ नंतर हा कांदा विक्रीसाठी तयार होईल. किमान ३० हजार मेट्रिक टन लाल कांद्याचे उत्पादन येण्याची शक्यता आहे. सध्या दुष्काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला हमीभाव मिळणे एवढीच काय ती जगण्याची आशा असताना कांदा बाजारभाव मात्र कोसळले आहेत.
सरासरी ३८ हजार क्विंटलची आवक
मालेगाव, देवळा व बागलाण या तालुक्यातून मुंगसे कांदा खरेदी केंद्र व उमराणे बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीला जातो. उमराणेत गेल्या पंधरवड्यात सरासरी दररोज २० हजार क्विंटल कांदा आवक झाली आहे. मुंगसे केंद्रात सोळा ते अठरा हजार क्विंटल कांदा आवक होत आहे. यात लाल कांदा मोठ्या प्रमाणात येत आहे. लाल कांद्याला ३०० ते ९४० रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला आहे, तर उन्हाळ कांद्याला ५० ते ३५० रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला आहे.
कांदा अनुदानाच्या अर्जासाठी २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
कांदा अनुदानाचा लाभ राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना घेता यावा यासाठी अर्ज करण्याची मुदत येत्या २५ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातल्या सव्वा लाख कांदा उत्पादकांनी बाजार समित्यांकडे अर्ज केल्याची माहिती पणन विभागाचे संचालक दीपक तावरे यांनी दिली. गेल्या वर्षी १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि खासगी बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एका कांदा उत्पादकाला २०० क्विंटल मर्यादेपर्यंत प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान मिळणार आहे. त्यानुसार पणन संचालक कार्यालयातर्फे अनुदान वितरणासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तावरे यांनी सांगितले की, सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आले आहेत. या कक्षात शेतकऱ्यांना अनुदानासाठीचे अर्ज विनामूल्य दिले जातात. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून १५ जानेवारीपर्यंत अनुदानासाठी अर्ज करण्याची मुदत होती. अर्जासोबतची कागदपत्रे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वेळ मिळावा यासाठी त्यात आता वाढ करण्यात आली आहे.
कांदा अनुदान घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजे ५० हजार अर्ज आले आहेत. पुणे जिल्ह्यातल्या सुमारे २० हजार कांदा उत्पादकांनी अनुदानासाठी अर्ज केले आहेत. राज्यभरातून सव्वा लाख कांदा उत्पादकांचे अर्ज आले आहेत. राज्यातल्या एकूण दोन लाख कांदा उत्पादकांपर्यंत या अनुदान योजनेचा लाभ पोहोचण्याची अपेक्षा पणन विभागाला आहे. प्रमुख १७ कांदा उत्पादक जिल्ह्यांतील ७५ लाख क्विंटल कांद्यासाठी अनुदान वाटप होईल.
नाशिक जिल्ह्यात आणखी तीन आत्महत्या
वसंत सोनवणे (५०), सायने खुर्द
वसंत सोनवणे या शेतकऱ्याने गुरुवारी (दि.१६) शेतात विषारी द्रव सेवन केले होते. त्यांना अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी (दि.१८) उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांचे ८५ आर शेतीक्षेत्र आहे. त्यांच्यावर सोसायटीचे दीड लाख रुपये कर्ज आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, २ विवाहित मुली व २ अविवाहित मुले आहेत.
चेतन बच्छाव (२३), नांदगाव (बु)
चेतन बच्छाव याने गुरुवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी (दि.१८) हा प्रकार उघडकीस आला. त्याच्या नावे नांदगाव सहकारी सोसायटीचे ६५ हजार रुपये कर्ज आहे. तसेच अस्पायर होम फायनान्स काॅर्पोरेशनचे पाच लाख २१ हजार १६७ रुपये कर्ज असल्याचे आढळून आले आहे. चेतन हा अविवाहित आहे.
शिवाजी कापडणीस, सारदे, सटाणा
शिवाजी कापडणीस, (५५) यांनी सततची नापिकी व उसनवार घेतलेले पैसे, बँकेचे कर्ज॔, कांदा पिकाचे घसरते भाव आदी कारणांमुळे विष घेऊन आत्महत्या केली. कापडणीस यांची सारदे येथे दहा एकर शेती असून हमीभाव मिळत नसून उत्पादन खर्च निघत नसल्याने नापिकी व कर्ज॔बाजारीपणाला कंटाळून जीवनयात्रा संपवली.
भाजपच्या सत्तेत वाढतोय शेतकरी आत्महत्यांचा आलेख
महाराष्ट्राला २००१ पासून शेतकरी आत्महत्येचा कलंक लागला आहे. त्याचे भांडवल करत भाजपने आघाडी सरकारला सळो की पळो करत केंद्र व राज्यात स्वत:ची सत्ता आणली. मात्र, त्यांच्या काळातच शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढत आहे. कंगाल बळीराजाचे दुष्टचक्र थांबायची चिन्हे दिसत नाहीत.
आत्महत्यांची विदारक स्थिती या आकडेवारीने समोर येते, त्यात काहीही बदल झालेला नाही. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, आर्थिक कुचंबणा, शेती मालाला भाव नाही, अशा कारणांसोबत सततचा दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस, पिकांवर पडणारे रोग, वाढता उत्पादनखर्च, कर्जाचा डोंगर अशा कारणांनी बळीराजा कंगाल होऊन जगण्याच्या शर्यतीत स्वत:ला संपवत आहे. आघाडी शासनाच्या काळात वाढणाऱ्या आत्महत्यांची मोठी चर्चा होती, त्यामुळे समाजमन चिंताग्रस्त होते, या विषयावर चिंतन- संशोधन होत होते. पण सध्या आत्महत्या वाढत असताना कोणताच गाजावाजा होत नाही.

Post a Comment