गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलने महेंद्र सिंह धोनीच भारताचा सर्वश्रेष्ठ कर्णधार असल्याचे वक्तव्य केले आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी एका टीव्ही शोमध्ये हे वक्तव्य केले. राहुलच्या मते धोनीने मिळवलेले यश त्याला चांगला कर्णधार बनवते. तर पांड्याच्या मते धोनीच्या नेतृत्वाखाली त्याने पदार्पण केल्याने तो चांगला कर्णधार आहे.
प्रसिध्द दिग्दर्शक करण जोहरने एका टीव्ही शोमध्ये हार्दिक पांड्याला आणि केएल राहुलला चांगला कर्णधार कोण असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी पांड्याने पदार्पणाची संधी दिल्याने धोनी चांगला कर्णधार असे सांगितले. तर राहुलने धोनीच्या अचिव्हमेंट त्यााला चांगला कर्णधार बनवतात असे मत व्यक्त केले.
करण जोहरने राहुलला कोणाला थेरपी घेण्याची गरज आहे? असे विचारले असता त्याने विराटचे नाव घेतले. तो म्हणाला ‘विराटला जरा शांत होण्याची गरज आहे. तो कधीही सुट्टीच्या मोडमध्ये नसतो. तो सतत काम, काम आणि काम याच्यातच असतो.’
राहुलने विराट हा ड्रेसिंग रूममधला सर्वात वात्रट पण, सर्वात रोमँटिकही मुलगा आहे असेही मत व्यक्त केले. पांड्या आणि राहुल ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेनंतर होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यात एकत्र दिसणार आहेत.

Post a Comment