0
कोल्हापूर - सर्किट बेंचसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेंडा पार्क येथील जागा आरक्षित करण्याचे आणि ११०० कोटींचा निधी देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, अद्याप निधीची तरतूद कोठे झाल्याचे दिसत नाही. यावरून ते बुद्धिजीवींना खुळ्यात काढण्याचे काम करीत असल्याचा आरोप आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला.

सर्किट बेंचबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना देताना ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘शेंडापार्क येथील जागा आरक्षित करून तब्बल ११०० कोटी देण्याचे आश्‍वासन पालकमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले होते. या जागेचे नेमके काय झाले?

याबाबतचा केवळ प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच, ११०० कोटींची अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद केलेली नाही. एकंदरीत आश्‍वासन देऊन पालकमंत्री बुद्धिजीवींना खुळ्यात काढण्याचे काम करीत आहेत.’’
Post a Comment

 
Top