0
मुबई : 

सध्या आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये बायोपीकची चलती दिसत आहे. २०१८ आणि २०१९ मध्ये पॅडमॅन, संजू, सूरमा, मंटो, मणिकर्णिका, ठाकरे, भाई, द अक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर हे आतापर्यंतचे गाजलेले चित्रपट आहेत. या चित्रपटांच्या यादीत आणखी एक चित्रपटाची भर पडत आहे. ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपीकची. आता या बायोपीकमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉयबरोबर अभिनेता बोमण इराणीही दिसणार आहे.


यासंदर्भात अभिनेता बोमण इराणी यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपीकचा आपणही एक भाग होणे म्हणजे एक सन्मानचं असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मी, निर्माता संदीप सिंग, ओमंग कुमार आणि विवेक ओबेरॉय या मजबूत टीमचा भाग असल्याने त्यांच्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहे.नवीन वर्षापर्यंत आणि मी या आश्चर्यकारक प्रवासाची वाट पाहत असल्याचे इराणी म्हटले आहे.

यासंदर्भात निर्माते संदीप सिंग यांनी, या प्रोजेक्टला बोमण त्याच्या अनुभवाच्या जाोरावर न्‍याय देईल असा विश्वास व्‍यक्‍त केला. या महिन्याच्या सुरूवातीलाच "पंतप्रधान नरेंद्र मोदी" बायोपीकची वेगवेगळ्या २३ भाषांमध्ये चित्रपट पोस्टर प्रदर्शित झाल्यामुळे गुजरातसह देशभरातील सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात चित्रीत केले जाणार आहे. या चित्रपटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चहा विक्रेता ते पंतप्रधानपर्यंतचा प्रवास दाखविण्यात येणार आहे.

Post a Comment

 
Top