0
नवी दिल्ली : 

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना कॅन्सरचे निदान झाले असून ते उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. अचानक जेटली यांना कॅन्सर निदान झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प जेटलींविनाच मांडला जाण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला मांडण्यात येणार आहे.एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार जेटली यांना मांडीचा कर्करोग झाला आहे. तो एक प्रकारचा ट्युमर असल्याने तो शरीराच्या उर्वरित भागात अतिशय वेगाने फैलावू शकतो, त्यामुळे सर्जरीसाठी जेटली यांनी न्यूयॉर्कला प्रयाण केले आहे.

दरम्यान, जेटली यांच्यावर सर्जरीचा निर्णय झाल्यास ती एक गुंतागुंतीची प्रक्रिया असणार आहे. जेटली यांच्यावर गेल्यावर्षी किडनी प्रत्यारोपण करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर नवीन सर्जरी करायचा निर्णय झाल्यास (केमोथेरपी) त्याचा ताण किडनीवर येऊ शकतो. किडनी प्रत्यारोपण केलेली प्रक्रिया अजूनही जेटलींच्या शरीराशी जुळू शकलेली नाही.

दोन आठवड्याच्या वैयक्तिक रजेवर जेटली यांनी न्यूयॉर्कला जात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अर्थसंकल्प मांडण्यासाठी जेटली उपस्थित असतील की नाही याबाबत साशंकता आहे. गेल्यावर्षी त्यांच्या अनुपस्थितीमध्ये रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी जेटलींची जबाबदारी सांभाळली होती.

Post a Comment

 
Top