0
मुंबई : 

बेस्ट कर्मचारी संघटनेने संप मागे घ्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (दि.१६) दिले. तसेच संप मागे घेण्याची घोषणा एक तासाच्या आत करावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यानंतर बेस्ट कर्मचारी संघटनेने लगेच संप मागे घेतला आहे. यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

बेस्ट कर्मचारी व्यवस्थापनाने दहा टप्प्यात पगारवाढीचे आश्वासन दिले आहे. हे कर्मचारी संघटनेने मान्य केले आहे. गेल्या ८ जानेवारीपासून ३२ हजार बेस्ट कामगार संपावर गेले आहेत. बेस्टच्या ३७०० बसेस जागीच उभ्या आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

दरम्यान, बेस्ट कामगारांच्या प्रश्‍नांवर स्थापन झालेल्या उच्च स्तरीय समितीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी स्वीकारला आणि आता संप मागे घेण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी बेस्ट कामगारांच्या संघटनांना बुधवारपर्यंतची मुदत दिली होती.

वाचा : सर्वसामान्यांना वेठीला धरणं चुकीचं : उच्च न्यायालय

आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही, अशी भूमिका बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतली होती. अखेर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाला आहे. यामुळे ९ दिवसांपासून सुरू असलेला संप मागे घेण्यात आला आहे.




Post a Comment

 
Top