0
ॲडलेड : 

ॲडलेड येथे झालेल्‍या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने आस्‍ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. कर्णधार विराट कोहलीचे धडाकेबाज शतक आणि महेंद्रसिंह धोनीच्या अर्धशतच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय मिळविला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी साधली आहे. या विजयाबरोबरच भारताच्या विजयात महत्‍वपूर्ण वाटा असलेल्‍या महेंद्रसिंह धोनीचे भारताचा माजी धडाकेबाज खेळाडू वीरेंद्र सेहवागने 'पिक्‍चर अभी बाकी है मेरे दोस्‍त' म्‍हणत कौतुक केले आहे.
धोनीच्या शानदार खेळीचे सोशल मीडियावरुन जोरदार कौतुक होत आहे. त्‍यामुळे तो ट्विटरवर ट्रेंडमध्येही आला आहे. महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक आणि विराटचे कौतुक करत ‘‘पिक्‍चर अभी बाकी है मेरे दोस्‍त.’ अशा कॅप्शनखाली धोनीचा फोटो आपल्‍या ट्विटरवर अकाउंटवरुन सेहवागने शेअर केला आहे. 

वाचा : विराटचा नवा विक्रम; संघकाराला टाकले मागे! 
ऑस्‍ट्रलियाविरुध्दच्या पहिल्‍या एकदिवसीय सामन्यात धीम्‍यागतीने खेळलेल्‍या धोनीने दुसऱ्या सामन्यात ५४ चेंडूत २ षटकारांच्या मदतीने नाबाद ५५ धावांची दमदार खेळी केली. पहिल्‍या सामन्यात धीम्‍यागतीने खेळल्‍यामुळे झालेल्‍या टीकेला धोनीने दुसऱ्या सामन्यातून प्रत्‍युत्‍तर दिले. खेळ समीक्षक अयाज मेनन यांनी तर धोनीने भारतीय संघाचे ओझे बनू नये, अशी टीका केली होती. सोशल मीडियावरही धोनीवर खूप टीका झाली होती. परंतु, मालिकेत सलग दोन अर्धशतके ठोकत त्‍याने टीकाकारांना जोरदार प्रत्‍युत्‍तर दिले. 

वाचा : रो'हिट' मॅनने मोडला ख्रिस गेलचा विक्रम!

धोनीने शेवटच्या षटकातील पहिल्‍या चेंडूवर शानदार षटकार मारत भारताला २९८ पर्यंत बरोबरीत पोहोचवले. दुसऱ्या चेंडूवर एक धाव काढून त्‍याने भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी साधली आहे.    

Post a Comment

 
Top