महापालिका निवडणुकीत १८ जागांवर विजय मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला.
नगर- मनपा निवडणुकीत पक्षादेश डावलून भाजपला साथ दिल्याप्रकरणी २८ डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस यांच्या स्वाक्षरीने ७ दिवसांत खुलासा करण्याची नोटिस १८ नगरसेवकांना बजावून कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार नगरसेवकांनी खुलासाही पाठवला होता, तथापि, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी १८ नगरसेवकांनी खुलासा न दिल्याचे कारण पुढे करत नगरसेवकांना बडतर्फ केले. त्यामुळे आता नगरेसवकांनी दिलेला खुलासा गायब झाला की गायब केला ? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
महापालिका निवडणुकीत १८ जागांवर विजय मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. तर काँग्रेसला अवघ्या ५ जागा मिळाल्याने आघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा गाठणे अवघड होऊन बसले होते. त्यातच शिवसेना व भाजप यांच्यात युतीचे सुत न जुळल्यामुळे एक नवीन समिकरण मनपात पहायला मिळाले. महापौर निवडीच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी १४ जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपला साथ देऊन सत्तेत आणले. या समिकरणामुळे राज्यभरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच याप्रकरणी गंभीर दखल घेत कारवाईचा इशारा दिला होता.
राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजी गर्जे यांनी दिलेल्या नोटिसेत मनपा निवडणुकीसाठी प्रदेशकडून भाजप अथवा शिवसेनेला पाठिंबा देऊ नये, असे स्पष्ट आदेश दिले होते. तथापि, पक्षाचा आदेश डावलून भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याने पक्षादेशाचा भंग झाला. याप्रकरणी ७ दिवसात खुलासा करावा व खुलासा न आल्यास काही एक सांगायचे नाही, असे समजून पुढील कार्यवाही करण्याचा इशारा दिला होता. राष्ट्रवादीच्या सर्व १८ नगरसेवकांनी एकत्रितपणे काही दिवसांपूर्वीच प्रदेश पातळीवर खुलासा पाठवला होता. या खुलाशात शिवसेनेवर काही आरोपही करण्यात आले होते. त्यानंतर शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचा खुलासा हास्यास्पद असल्याचा टोलाही लगावला होता. आरोप प्रत्यारोप इथेही थांबले नाहीत, त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन पैसे घेतल्याचा आरोप करणाऱ्यांनी स्वत:चे घर तपासावे असा प्रतिटोलाही शिवसेनेला लगावला होता. भाजप सत्तेत आल्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादीत जुंपल्याचे चित्र आहे. दरम्यान, ११ जानेवारीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी १८ नगरसेवकांना बडतर्फ करण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशात सात दिवसात खुलासा करण्याबाबत नोटिस पाठवण्यात आली होती, परंतु, खुलासा न केल्यामुळे पक्षातून काढल्याचे या स्पष्ट केले. एकीकडे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी खुलासा पाठवाला होता, तर दुसरीकडे प्रदेशकडून खुलासा न केल्याचे कारण दाखवून त्यांना बडतर्फ करण्यात आले. त्यामुळे नगरसेवकांनी पाठवलेला खुलासा प्रदेशपातळीवर पोहोचला नसल्याचे दिसून येत आहे. जर खुलासा पोहोचला नाही, तर गेला कुठे ? तो कोणी गायब केला का ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन भूमिका मांडणार आहेत. या भेटीत निर्णयाचा फेरविचार करण्याचीही विनंती केली जाणार आहे.
प्रसंगी टोकाची भूमिका घेऊ...
आम्ही सर्वजण एक विचाराने एका विचाराने शहर विकासाची भूमिका घेून शहरात काम करत आहोत. शहराच्या विकासाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही. ज्या ठिकाणी चुकीचे काम करण्याचा प्रयत्न होईल, तेथे पूर्ण ताकदीनीशी विरोध केला जाईल, प्रसंगी टोकाची भूमिका घेण्याचाही निर्णय घेऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी स्पष्ट केले.
आम्ही खुलासा दिला आहे...
पक्षाने केलेली कारवाई सोशल मडियाच्या माध्यमातून नगरसेवकांना समजली. खुलासा श्रेष्ठींना मिळाला नसल्याचे त्यात नमूद असले तरी आम्ही खुलासा दिलेला आहे. आता सर्वजण पक्ष श्रेष्ठींची भेट घेऊन आमची बाजु मांडणार आहोत. त्यावेळी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंतीही केली जाणार असल्याचे नगरसेवकांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले.
आमदार संग्राम जगतापही राहणार उपस्थित
राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व नगरसेवकांनी श्रेष्ठींची भेट घेऊन भूमिका मांडण्याचा निर्णय घेतला. या भेटीच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप उपस्थित राहणार आहेत. आ. जगताप या भेटीच्यावेळी समक्ष उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment