0
उत्तर प्रदेशातील भाजपच्या नेत्याने मंदिरातच जेवणाच्या पॅकेटमधून दारुच्या बाटल्या वाटल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ माजली असून या प्रकरणावर विरोधी पक्षांच्या नेत्यांबरोबरच भाजपच्या नेत्यांनीही टीका केली आहे. दारुच्या बाटल्या वाटणाऱ्या नेत्याचे नाव नितीन अग्रवाल आहे. तो भाजपचे नेते नरेश अग्रवाल यांचा मुलगा आहे. अग्रवाल यांनी हदौई येथील श्रावण देवी मंदिरात कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात दारूच्या बाटल्या वाटण्यात आल्या.

हदौई येथील श्रावण देवी मंदिरात अग्रवाल यांनी पासी समाजाच्या लोकांसाठी एक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात गावातील प्रमुखाने तेथे जमलेल्या लोकांना जेवणाची पॅकेट्स वाटले. या पॅकेटमध्ये जेवणाबरोबरच दारुच्या बाटलीही देण्यात आली होती. या कार्यक्रमला लहान मुलेही उपस्थित होती त्यांनाही दारुच्या बाटल्या वाटण्यात आल्या.

या भयानक प्रकारावर विरोधकांसह भाजपचे खासदार अंशुल वर्मा यांनीही टीका केली आहे. त्यांनी ‘मंदिरात दारूचे वाटप म्हणजे पासी समाजाचा अपमान करणे आहे. भाजपने अशा नेत्याला आपल्या पक्षात घेतले आहे. या निर्णयाचा पुन्हा विचार करावा लागेल.’ असे मत व्यक्तव्य केले. नरेश अग्रवाल हे या आधी समाजवादी पक्षाचे खासदार होते. त्यांनी २०१८ ला भाजपमध्ये प्रवेश केला होता. नरेश अग्रवाल हे याआधी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत आले होते. 

Post a Comment

 
Top