0
नवी दिल्ली : 

भारताने ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मलिका जिंकत इतिहास रचला होता. भारताने चार कसोटी सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. या मालिकेचा हिरो ठरला तो चेतेश्वर पुजारा. त्याने या मालिकेत तीन दमदार शतके ठोकत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पण, आयसीसीने या ऐतिहासिक कामगिरीची दखलच घेतली नाही असे दिसते. आयसीसीने नुकताच आयसीसीच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाची घोषणा केली. आयसीसीच्या कसोटी संघात चेतेश्वर पुजाराचा समावेश करण्यात आलेला नाही.

आयसीसीने २०१८ च्या कसोटी आणि एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. कसोटी तसेच एकदिवसीय संघाचे नेतृत्व भारताचा कर्णधार विराट कोहलीकडे देण्यात आले आहे. कसोटी संघात तीन भारतीय खेळाडूंची तर एकोदिवसीय संघात चार भारतीय खेळाडूंची वर्णी लागली आहे. कसोटी संघात विराट कोहलीसह विकेट किपर रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराहला संधी मिळाली आहे. तर ऑस्ट्रेलिया मालिकेत खोऱ्याने धावा करणाऱ्या तसेच कसोटीत १७ शतके ठोकणाऱ्या चेतेश्वर पुजाराला स्थान देण्यात आलेले नाही. आयसीसीच्या एकदिवसीय संघात रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव अशा चार भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. 

Post a Comment

 
Top