0
कांदा साठवून ठेवायचा तरीही रोजचे खायचे वांदे आणि विकायचा तरीही घाट्याचा सौदा, अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे.

तासगाव : शहरांमध्ये छोट्या मालगाड्यांमधून भाजीपाला, कांदा-बटाटे विकणारे शेतकरी किंवा त्यांच्याकडून गोळा करून विकणारा व्यापारी आपण बऱ्याचदा पाहतो. मात्र, कांद्याचे दर कमालीचे घरलेले असल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे वांदे झाले आहेत. कांदा साठवून ठेवायचा तरीही रोजचे खायचे वांदे आणि विकायचा तरीही घाट्याचा सौदा, अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे. यामुळे हा कांदा शेतकऱ्यांना मिळेल त्या दराने रस्त्याशेजारी विकावा लागल्याचे चित्र सध्या तासगाव-सांगली रस्त्यावर दिसत आहे.


कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला प्रती किलो 2-3 रुपयांचा दर मिळत आहे. उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, यामध्ये ग्राहकांचे आणि व्यापाऱ्यांचे फावले आहे. बाजारात सध्या 20 रुपयांच्या दराने कांदा ग्राहकांना विकला जात आहे. मात्र, शेतकऱ्य़ांना 2 ते 3 रुपयांचा दर मिळत आहे. यामुळे अडत्यांच्या कात्रीत पिचलेला शेतकरी अगतिकपणे मिळेल त्या दराने कांदा विकू लागला आहे. यासाठी एखादा ट्रक भाड्याने घेऊन राज्य महामार्ग, गावोगावी जात रस्त्याशेजारीच पाच रुपये किलोने कांदा विकत आहे.


याचा फायदा मात्र ग्राहकांना होत आहे. बाजारात 20 रुपये मोजण्यापेक्षा या शेतकऱ्यांकडून 5 रुपये किलो दराने कांदा मिळत असल्याने या मालगाड्यांजवळ झुंबड उडत असल्याचे पाहायला मिळत आहे. सीमाभागातील जमखंडीच्या शेतकऱ्याने कांदा कोल्हापूरच्या बाजारात विकण्यास आणला होता. मात्र, त्याला तेथे तीन रुपये दर सांगण्यात आला. सांगलीतही तोच दर सांगितला गेला. यामुळे या शेतकऱ्याने निराश होत रस्त्याशेजारीच ट्रक उभा करून अवघ्या 5 रुपये किलोने कांदा विकण्यास सुरुवात केली. यामुळे तेथील स्थानिकांमध्ये ही बातमी पसरताच काही वेळातच त्यांनी गर्दी करून गाड्या भरून कांद्याची पोती नेली. यामुळे काही काळ या रस्त्यावरील वाहतूकही खोळंबली होती.Take onion, onion, Rs 5 per kg... farmers' cleverness, self-made trader | कांदा घ्या कांदा, ५ रुपये किलो कांदा... शेतकऱ्याची हुशारी, स्वतःच झाला व्यापारी

Post a Comment

 
Top