0
आगामी काळात राजकारणाच्या शुद्धिकरणाची मोहीम राज्यव्यापी आणि प्रभावी स्वरूपात राबविली जाणार आहे.
वेरुळ- निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे उत्तराधिकारी 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी औरंगाबाद मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे.

आगामी काळात राजकारणाच्या शुद्धिकरणाची मोहीम राज्यव्यापी आणि प्रभावी स्वरूपात राबविली जाणार आहे. राजकारणात चांगल्या व्यक्तींनी यावे आणि मतदारांनी सत्पात्री मतदान करावे, यासाठी जय बाबाजी भक्त परिवाराने हजारोंच्या संख्येने एकत्र येत राजकारणाच्या शुद्धीकरणाची वज्रमूठ आवळली आहे. या अनुषंगाने मंगळवारी वेरुळ येथे जय बाबाजी भक्त परिवाराची बैठक झाली. स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी औरंगाबाद मतदार संघातून लोकसभा लढवावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.

प्रचार प्रमुख राजेंद्र पवार यांनी सांगितले की, लोकशाहीतील सर्वोच्च ठिकाण म्हणजे संसद आहे. संसदेला आपण मंदिर मानतो. या मंदिरात जाणारा प्रत्येक प्रतिनिधी हा जनतेतून निवडून जात असतो. परंतु देशात मतदान न करणाऱ्याचीच संख्या जास्त आहे. स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी आपल्या लाखो भक्तांच्या साक्षीने 'राजकारणाचे शुद्धिकरण' हा मुद्दा पुढे करून आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. या अनुषंगाने सध्या जय बाबाजी भक्त परिवारासह या मुद्द्याला साथ देणाऱ्या मतदारामध्ये सध्या मोठा उत्साह आहे. स्वत: महाराज व जय बाबाजी भक्त परिवार नाशिक, जळगावसह अनेक मतदार संघात बैठका घेत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, सामाजिक एकतेसाठी, उद्योगाना चालना देण्यासाठी, शेतकरी-कष्टकरी मजुरांच्या प्रश्नावर वेरुळ येथील बैठकीत चर्चा करण्‍यात आली. या सर्व समस्या सोडविण्यासाठी स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्यासारखी त्यागी संताची गरज आहे. भक्त परिवार व जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनाचा आग्रह लक्षात घेता स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी औरंगाबाद मतदार संघातून लोकसभा लढवावी, ही एकमुखी मागणी करण्यात आली.

राजकारणाचे शुद्धिकरणाची व्यापक मोहिम..
महाराष्ट्रभरातील जय बाबाजी भक्त परिवाराने 15 लोकसभा जागेवरून चारित्र्य संपन्न लोकप्रतिनिधी संसदेत पाठविण्याचा निर्धान्याचा तसेच राजकारणाचे शुद्धीकरण ही मोहिम जिल्ह्याभरातील 1200 गावातील 17 लाख मतदारापर्यंत पोहोचवणे. 100 टक्के मतदान करून घेण्याचाही संकल्पही बैठकीत करण्यात आला. यावेळी या मोहिमेसाठी प्रचार प्रमुख म्हणून राजेंद्र पवार, निरीक्षक म्हणून कैलास कुरहाडे व गणेश बोराडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर या बैठकीस विष्णु महाराज व शिवाभाऊ अंगुलगावकर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील विधानसभा निहाय एकूण 112 प्रमुख पदाधिकार्‍यांचीही यावेळी निवड करण्यात आली.


जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने निर्धार मेळावे तसेच लोकशाहीवर विश्वास असलेल्या मतदारांच्या उपस्थितीत लवकरच जालना, औरंगाबाद, जळगाव, शिर्डी, दिंडोरी, अहमदनगर, धुळे, नाशिक आणि पुणे या मतदार संघात लवकरच निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ही प्रचारप्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली आहे. यावेळी जनार्दन रिठे, शेकनाथ दादा होळकर, नरेंद्र बिडवे, बाजीराव गांगुर्दे, रावसाहेब डोखळे, पोपट पवार, कडुबा जगताप, गणपतराव म्हस्के, पोपटराव इंगळे, रावसाहेब सोटम, नानासाहेब पळसकर, राजू पळसकर, रामसिंग गुंडाळे, पूंजाराम वाकळे, पोपटराव मगर, अंकुश जाधव, जाधव मिस्त्री, गोरख अण्णा गावंडे, नानासाहेब कारभार, कडुबा हारदे, वसंत उबाळे यांच्यासह बहुसंस्थेने उपस्थिती होती.Swami Shantigiriji Maharaj will contest the loksabha Election Form Aurangabad Constituency

Post a Comment

 
Top