0
स्नायू दाबल्यानंतर का मिळतो आराम?

हाता-पायांमध्ये वेदना होत असतील तर ते दाबल्यानंतर थोडा वेळासाठी का असेना तात्काळ आराम मिळतो. जिम केल्यानंतर थकलेल्या मांसपेश्या दाबल्यानंतरही आराम मिळतो. हेल्थ एक्सपर्ट आणि एथली मानतात की, यामुळे सूज कमी होते, रक्तप्रवाह वाढतो आणि स्नायूंचा कठोरपणा दूर होतो. असे दिर्घकाळापासून मानले जाते. पण स्नायू दाबल्यामुळे आराम का मिळतो याचे कारण आज कळाले आहे. दिर्घ संशोधनानंतर सायन्स ट्रान्सलेशन मेडिसिनमध्ये एक रिपोर्ट प्रकाशित झाला.


स्नायू दाबल्यानंतर का मिळतो आराम?
- ओंटेरियोच्या मॅकमास्टर यूनिव्हर्सिटीमध्ये संशोधन करण्यात आले. यामध्ये पाहिले की, एखाद्या खास ठिकाणी दाबल्यानंतर मासपेश्यांमध्ये बदल होतो. कोणतेही पेनकिलर असे करु शकत नाही. यावेळी 11 लोकांवर संशोधन करण्यात आले. हे सर्व लोक एग्जॉस्टिक एरोबिग एक्सरसाइज करत होते. यामध्ये खुप थकवा येतो. व्यायामानंतर स्नायू दाबल्यानंतर काय बदल होतात हे जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर संशोधन करण्यात आले.
- या संशोधनानंतर सहभागी लोकांच्या एका पायामधून टिश्यू काढण्यात आल्या. यानंतर त्यांना तासभर सायकलवर एक्सरसाइज करण्यास सांगण्यात आले. यानंतर 10 मिनिटे त्यांच्या फक्त एकाच पायाची मसाज करण्यात आली. तर दूसरा पाय आपोआप ठिक होण्यासाठी सोडून देण्यात आला. मालिश केल्यानंतर लगेच दोन्ही पायांच्या जांघेमधून पुन्हा टिश्यू घेण्यात आले. मग अडीच तासांच्या आरामानंतर तीसरी बायोप्सी करण्यात आली. यामधून स्नायूंचे संशोधन करण्यात आले.
- पीडियाट्रिक आणि मेडिसिनचे प्रोफेसर आणि प्रमुख संशोधनकर्ता डॉ. मार्क एक टार्नोपोलस्कीनुसार शरीर दाबल्यानंतर स्नायू औषधांपेक्षा चांगली प्रतिक्रिया देतात. तर औषधांमुळे अनेक साइड इफेक्ट होतात. औषध घेतल्यावर सूज आणि वेदना तात्काळ कमी होतात. यामुळे दिर्घकाळ नुकसान होते. कारण हे शरीराची नैसर्गिक प्रक्रिया थांबवते. तर दूसरीकडे मालिश केल्याने सूज कमी होते आणि मासपेश्या लवकर रिकव्हर होतात.
- त्यांना या संशोधनात कळाले की, मालिश करताना कोशिकांमधील पावरहाउस म्हणजे मायटोकॉन्ड्रिया झपाट्याने उत्पादित होते. हे पावरहाउस ग्लूकोजचे रुपांतर ऊर्जेत करते. यामुळे मोडलेल्या स्नायूंची अवस्था चांगली होते आणि ते लवकर काम करतात. मसाजमुळें साइटोकिन्स नामक कंपाउंडही उत्पादित होते. हे सूज कमी करते.
- जोरदार व्यायाम केल्याने स्नायूंच्या तंतू कमजोर होतात, यामुळे पायावर सूज येते. ही शरीराची एक प्रक्रिया आहे. यामुळे स्नायूंची अवस्था ठिक होते, पण यासाठी खुप वेळ लागतो.
why massage gives instant relief in body ache

Post a Comment

 
Top