सिंबा' या यशस्वी चित्रपटानंतर आता अभिनेता रणवीर सिंह आणि आलिया भट्ट या क्यूट जोडीचा नवा चित्रपट येतोय. विशेष म्हणजे, ही जोडी पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. गली बॉय असे चित्रपटाचे टायटल असून सध्या दोघेही 'गली बॉय'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्या गली बॉयचा पोस्टर रिलीज झाला आहे. रणवीर-आलिया यांचा पहिला लुक या पोस्टरमधून दिसत आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा काहीतरी वेगळी असणार हे नक्की! दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 'गली बॉय' लवकरच रिलीज होण्याच्या मार्गावर आहे.
Post a Comment