0
भाजप : मते ६ टक्केच जास्त, जागांत मात्र ७७% वाढ, काँग्रेस : मतटक्का २.५%च घटला, जागा ८०% कमी


औरंगाबाद- २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार भाजपने महाराष्ट्रात विक्रमी २३ खासदार निवडून आणले. भाजपच्या १९९९ पासूनच्या म्हणजे गेल्या १५ वर्षांतील कामगिरीचा आढावा घेतला तर त्यांना मिळालेल्या मतांमध्ये केवळ ६ टक्केच वाढ झाल्याचे दिसते. त्या तुलनेत खासदारांची संख्या मात्र ७७ टक्क्यांनी वाढली. त्या दुसरा राष्ट्रीय पक्ष काँग्रेसच्या मतांचे प्रमाण गेल्या १५ वर्षांत केवळ २.५ टक्केच घटले. त्यांच्या जागांची संख्या मात्र तब्बल ८० टक्क्यांनी घटली. २०१४ मध्ये राज्यात सर्वत्र भुईसपाट झालेल्या काँग्रेसची लाज मराठवाड्यातील अशोक चव्हाण (नांदेड) व राजीव सातव (हिंगोली) या दोन खासदारांनीच राखली. भाजपच्या बरोबरीने मित्रपक्ष शिवसेनेनेही चांगली प्रगती केली. गेल्या १५ वर्षांत या पक्षाच्या मतांचे प्रमाण ३.७७ टक्क, तर खासदारांची संख्या २० % वाढली. मोदी लाटेचा फायदा घेत शिवसेनेही २०१४ मध्ये १८ खासदार निवडून आणत आजवरची सर्वोच्च संख्या गाठली. कधीकाळी पंतप्रधानपदाचे दावेदार समजले जाणारे शरद पवार हे अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पक्ष स्थापनेपासून म्हणजे १९९९ पासून खासदारांचा दोनअंकी आकडाही गाठता आलेला नाही.


भाजप : राज्याच्या इतिहासात प्रथमच २३ जागा
मतटक्का ६.१४ टक्के तर जागा ७७ टक्के वाढल्या. खासदार संख्या १३ वरून २३ वर गेली. आजपर्यंतची सर्वोच्च कामगिरी.

भाजपला सर्वाधिक २७ % मते
2014 भाजपला 27.32% मते मिळाली. 2009 च्या 18.17% च्या तुलनेत तो 9.15 टक्क्यांनी वाढला. विजयी जागांचा आकडा 9 वरून 23 वर (+255.55%) गेला.

शिवसेना : १५ वर्षांत जागा २० % वाढल्या
गेल्या १५ वर्षांत शिवसेनेचा मतटक्का ३.७७ टक्क्यांनी वाढला. जागा १५ वरून १८ पर्यंत म्हणजेच २० टक्क्यांनी वाढल्या.

शिवसेना २० % मते घेत दुसऱ्या स्थानी
2014 मध्ये शिवसेनेला 20.63% मते मिळाली. 2009 च्या 17.00 टक्क्यांच्या तुलनेत त्यात 3.63% वाढ झाली. विजयी जागांचा आकडा 11 वरून 18 (+63.63%) झाला.

काँग्रेस : खासदार संख्येत ८० टक्क्यांनी घट
काँग्रेसचा मतटक्का २.५ टक्क्यांनी घटला. जागाही १० वरून
२ इतक्या नीचांकीवर. म्हणजेच त्यात ८० टक्क्यांनी घट झाली.

काँग्रेसची मते राष्ट्रवादीपेक्षा जास्त, जागा मात्र कमी
2014 मध्ये काँग्रेसला 18.13% मते होती. 2009 च्या 19.61 च्या तुलनेत त्यात 1.41% घट झाली. जागाही 17 वरून 2 वर येऊन (-88%) घटल्या.

राष्ट्रवादी : मतांची टक्केवारी ५ टक्क्यांनी घटली
१५ वर्षांत राष्ट्रवादीचा मतटक्का ५.६१ टक्क्यांनी घसरला. जागाही ६ वरून ४ वर आल्या. म्हणजेच त्या ३३.३३ % घटल्या.

राष्ट्रवादीला ५० टक्के जागांचा फटका
2014 मध्ये राष्ट्रवादीला 15.97% मते होती. 2009 च्या 19.28 च्या तुलनेत त्यात उणे 3.31% घट झाली. जागाही 8 वरून 4 वर येऊन (- 50%) घटल्या.
last four Lok Sabha elections in Maharashtra

Post a comment

 
Top