0
आठवलेंच्या सभेत खुर्च्यांची फेकाफेक, घोषणाबाजी

औरंगाबाद- विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त आयोजित केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या सभेत रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद शेळके यांनी प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता ‘चोर’ म्हटले. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी सभेत खुर्च्यांची फेकाफेक करत गोंधळ घातला.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या प्रांगणात सोमवारी रात्री ९ वाजता सभा सुरू झाली. प्रकाश आंबेडकरांकडे मोर्चा वळवत शेळके म्हणाले, ‘शैक्षणिक इमारती उभ्या कराव्यात म्हणून बाबासाहेबांनी येथे जमीन विकत घेऊन ठेवली. पण आंबेडकरांचे नातू ती जमीन विकत आहेत. ते चोर आहेत.’ हे ऐकताच कार्यकर्त्यांनी ‘बाबासाहेबांचा विजय असो, बाळासाहेबांचा विजय असो’ अशा घोषणा देत खुर्च्यांची फेकाफेक केली. शेळके यांनी ‘मला कोणावरही टीका करायची नाही,’ असे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. नंतर आठवले यांनी भाषणात ‘माझ्या पदाधिकाऱ्याने कोणाबद्दलही असे बोलणे मला पसंत नाही, आपण काय बोलतो याचे भान ठेवले पाहिजे,’ असे स्पष्ट केले. गोंधळाची माहिती मिळाल्यावर पोलिस बंदोबस्त वाढवला. तरीही सभा संपेपर्यंत घोषणाबाजी सुरूच होती.Ramdas Athavale addressing Prakash Ambedkar as a 'thief', chaos and chairs throw in air

Post a Comment

 
Top