0
बेळगाव : 

येथील लेले मैदानावर बेळगावच्या प्रदीप सासणे यांनी भरदुपारी सलग 12 मिनिटे सूर्याकडे पाहण्याचा विक्रम केला. या त्यांच्या विक्रमाची नोंद लंडन रेकॉर्ड बुकमध्ये करण्यात आल्याने बेळगावच्या शिरपेचात एक मानाचा तूरा रोवला गेला.

मूळचे पडलीहाळ (ता. चिकोडी)व सध्या भाग्यनगर, बेळगाव येथे टॅक्स प्रॅक्टीशनर म्हणून सासणे काम करत आहेत. त्यांनी गेल्या चार वर्षात ही कला अवगत केली आहे. रविवारी दि.20 रोजी टिळकवाडी, लेले मैदानावर दुपारी 12 वाजता हा विक्रम पार पडला. विक्रमाच्या चित्रणासाठी लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे पदाधिकारी व सर्वोच्च न्यायालयाचे वकील संतोश शुक्‍ला  तसेच भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे सदस्य भारत शर्मा यांची खास उपस्थिती होती.  सासणे यांच्या या प्रयोगानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र सादर केले. 

यावेळी महापौर बसप्पा चिक्‍कलदिन्‍नी, उपमहापौर मधुश्री पुजारी, पंढरी परब, शालन सासने, योगिता सासने, बाळकृष्ण गोडसे, तुषार तासिलदार आदी उपस्थित होते. 

Post a Comment

 
Top