0
कोल्हापूर- शहरातील एका कर्तव्यदक्ष पोलिस अधिकार्‍याची सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहे. एवढेच नाही तर या पोलिस अधिकार्‍यावर कौतुकाचा वर्षावही होताना दिसत आहे सुरज गुरव असे या वरीष्ठ पोलिस अधिकार्‍याचे नाव असून त्याने मंत्री मंत्र्यांना खडे बोल सुनावले आहेत.

'एकतर घरी नाहीतर गडचिरोलीला जायची तयारी आहे. पण भीती घालू नका, आम्ही कर्तव्य जबावतो. साहेब, आम्ही राजकारण करत नाही आणि करायचेही नाही. कोणाच्या वर्दीवर येण्याची गरज नाही, आपण घरी जावे', अशा शब्दात उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) सुरज गुरव यांनी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सुनावले. सुरज गुरव यांच्या बाणेदार उत्तराने उपस्थित चांगलेच प्रभावित झाले. नेत्यांना त्यांची जागा दाखवून देणार्‍या या पोलिस अधिकार्‍याचा व्हिडीओ सोशल मीडियातून व्हायरल होत आहे.

काय आहे हे प्रकरण?
कोल्हापूर महापालिकेच्या महापौर निवडीवेळी महापालिकेत केवळ नगरसेवकांना प्रवेश देण्यात आला होता. परंतु ओळखपत्र पाहून आत सोडण्यावरून आमदार हसन मुश्रीफ यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे बंदोबस्तासाठी असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव यांच्या शब्दीक चकमक झाली. परवानगीशिवाय कोणालाही महापालिकेत जाता येणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली होती. पोलिसांनी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी गेटवरच रोखले. गुरव यांनी आमदारांच्या दबावासमोर न झुकता त्यांना रोखठोक उत्तर देऊन त्यांना तिथून माघारी पाठविले. या प्रकारानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पोलिस प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. यावरून काही काळ महापालिकेबाहेर तणाव निर्माण झाला होता.Kolhapur dysp Suraj Gurav daring Against Congress and NCP MLA

Post a Comment

 
Top