0
बॉलिवूड डेस्क. टायगर श्रॉफ नुकताच नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्याच्या नृत्य अकादमीच्या उद््घाटनावर गेला होता. या कार्यक्रमात त्याने मुलांसोबत नृत्य केले. या वेळी टायगर म्हणाला, नृत्य आणि संगीत वैश्विक भाषा आहे. मला जर संधी मिळाली तर मी हॉलीवूडमध्ये बॉलीवूड शैली प्रसिद्ध करणार. माझे सर्व हिट गाणे गणेशनेच कोरियोग्राफ केले आहेत. मी नेहमीच डोळे बंद करू त्यांना फॉलो करत असतो. लोक मला माझे पहिले गाणे 'व्हिसल बजा'द्वारे ओळखतात. गणेशजीने मला ही ओळख दिली आहे. दुसरीकडे या वेळी त्याला जेव्हा हृतिकसोबतच्या नाव न ठरलेल्या चित्रपटाविषयी विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, या चित्रपटाविषयी मी उत्सुक आहे.
खरं तर टायगरची ख्याती विदेशापर्यंत पाेहोचली आहे. त्याला तेथून मोठमोठ्या ऑफर्सदेखील येत आहेत. टायगर ते हाॅलीवूड ऑफर्स स्वीकारण्याचा विचार करत होता, मात्र अचानक त्याने आपले मन बदलले. एका रिपोर्टनुसार...,जॅकी श्रॉफने टायगरला म्हटले, हॉलीवूडमध्ये जाण्याची इतकी घाई करू नको, आधी बॉलीवूडमध्ये आपली जागा कायम कर.

बागी 3ची' तयारी सुरू, संवाद लिहिणार फरहाद
'
टायगरच्या खात्यात सध्या 'बागी 3'देखील आहे. त्याचे दिग्दर्शन साजिद नाडियाडवाला करतील. त्याचा हा चित्रपट फरहाद समजी लिहिणार आहेत. फरहादला 'सिंबा'साठी चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाचे संवाद त्यांनीच लिहिले होते. "बागी 3' विषयी फरहाद म्हणतो...,नंबर 3 माझ्या मनाच्या खूपच जवळ आहे. एक लेखक म्हणून मला 'गोलमाल 3' साठी सर्वात जास्त प्रशंसा मिळाली आणि एक दिग्दर्शक म्हणून मी 'हाउसफुल 3' मिळाला. तो चित्रपट १०० कोटींच्या घरात गेला. आता पुन्हा मला 'बागी 3' लिहिण्याची संधी मिळाली आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, चित्रपट या ३ गोष्टीमुळे चांगला ठरेल. पहिली साजिद नाडियाडवालाचे मार्गदर्शन, दुसरे अहमद खानची दूरदृष्टी आणि तिसरे माझे लेखन.
Bollywood dance style will make it popular in Hollywood : Tiger shroff

Post a Comment

 
Top