मुलाखत म्हणजे मोदींनीच मोदींची मुलाखत घेतल्यासारखे असल्याचा टोला राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्राद्वारे लगावला आहे.
मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीवर राज यांनी व्यंगचित्राद्वारे टीकास्त्र सोडले आहे. ही मुलाखत म्हणजे मोदींनीच मोदींची मुलाखत घेतल्यासारखे असल्याचा टोला राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्राद्वारे लगावला आहे. 'एक मनमोकळी मुलाखत', असे या व्यंगचित्राला राज यांनी शीर्षक दिले आहे.
मोदींनीच घेतली मोदींची मुलाखत
नरेंद्र मोदी यांनी स्वत:ची मुलाखत घेतल्याचे राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रात रेखाटले आहे. मुलाखत घेणारे मोदी मुलाखत देणाऱ्या मोदींना 'बोला काय विचारु?' असे विचारताना दिसत आहेत.

Post a Comment