नागपूर :
गरीबी आणि एकाकीपणाला कंटाळून नागपूर जिल्ह्यामधील ओमसाई नगरमधील एका वृद्ध दाम्पत्याने विष पिऊन जीवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना घडली. बुधराम कटरे आणि त्यांची पत्नी रामीबाई कटरे यांनी राहत्या घरीच विष पिऊन आत्महत्या केली.
त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्या नोटमध्ये कर्जबाजारी, पैशाची चणचण आणि एकाकीपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. त्यांचे मृतदेह घरीच पडून होते. शेजाऱ्यांना शंका आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधरामजी यांनी अनेक वर्षांपूर्वी दुसरा घरठाव केल्याने तीन मुली आणि एक मुलगा असूनही ते कळमन्यात दुसरी पत्नी रामीबाईसोबत निराधार जीवन जगत होते. छोटेसे किराणा दुकानही चालत नव्हते. त्यामुळे त्यांची आर्थिक अवस्थाही खराब झाली होती. जगण्याचा आधार नसल्यामुळे शेवटी या वृद्ध दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या केली.

Post a Comment