
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बेंगळुरूला प्रवास करत असलेल्या प्रवाशाच्या बॅगेजमधून २२ जिवंत काडतुसे सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना स्पाईस जेट एअलाईन्सच्या विमानामध्ये घडली. स्पाईस जेट एअलाईन्सच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार लक्षात आला. ही काडतुसे पाँईंट २२ कॅलिबरची आहेत. संशयिताला स्पाईस जेट एअरलाईन्सकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संबंधित संशयित कोणतीही वैध कागदपत्रे दाखवू न शकल्याने त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. स्पाईस जेटच्या विमानात (क्रमांक SG-519 ) मध्ये हा प्रकार पहाटे पावणे पाचच्या सुमारास उघडकीस आला.
दरम्यान, काल (ता. ९) स्पाईस जेट एअरलाईन्सच्याच विमानात (क्रमांक SG-13) तांत्रिक बिघाड झाल्याने दुबईला जाणारे परत मुंबईत परतले होते. विमानतळावर विमानाची तांत्रिक पाहणी झाल्याने पुन्हा दुबईकडे प्रस्थाण झाले. इर्मजन्सी लँडिंग करण्यात आले नव्हते असे एअरलाईन्सकडून स्पष्ट करण्यात आले.
Post a Comment