0
येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणीत ‘यूपीए’ला 167 आणि इतर पक्षांना 143 जागा मिळून विरोधकांचे संख्याबळ 310 इतके वाढेल तर भाजप-एनडीएला 203 पर्यंतच जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करत एबीपी न्यूज आणि सी-व्होटर यांनी त्रिशंकू लोकसभेचे भाकीत एका सर्वेक्षणानंतर केले आहे.

उत्तर प्रदेशात भाजपची मोठी पीछेहाट

उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या झालेल्या ‘आघाडी’मुळे त्या राज्यात मागील निवडणुकीत 71 जागा जिंकणाऱया भाजपची यावेळी धक्कादायक पीछेहाट होईल असे ताजे सर्वेक्षण सांगते. भाजपला तिथे 24 जागा आणि त्याच्या मित्रपक्षाला फक्त एक जागा मिळेल असा अंदाज आहे. तिथे सर्वाधिक म्हणजे 51 जागा सपा-बसपा आघाडीला तर चार जागा काँग्रेसला मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नितीश कुमारांमुळे बिहारमध्ये ‘एनडीए’चे पारडे जड
बिहारमध्ये भाजपला मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाची साथ असल्यामुळे तिथे ‘एनडीए’चे पारडे जड राहील असे या सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे. त्या राज्यात 40 पैकी 35 जागा एनडीएला मिळतील तर पाच जागा लालूप्रसाद यादव यांचे राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसला मिळतील असा अंदाज आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममतांची जादू कायम
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्या, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची जादू कायम आहे असे स्पष्ट दिसत आहे. त्या राज्यातील 42 पैकी 34 जागा तृणमूल काँग्रेसच जिंकेल असा सर्वेक्षणाचा अंदाज आहे तर छत्तीसगडमध्ये 11 पैकी 5 जागा एनडीएला आणि 6 जागा यूपीएला मिळण्याची शक्यता आहे.modi-fail-lok sabha

Post a Comment

 
Top