डिप्रेशनमध्ये होते आणि स्मृतीही गेली होती : फॅमिली फ्रेंड फौजिया अर्शीने सांगितले कारण
एंटरटेन्मेंट डेस्क : ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन झाले आहे. त्यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खालावत चालली होती. त्यांच्यावर कॅनडामध्ये उपचारही सुरु होते. पण अखेर सिनेसृष्टीतील एक लखलखता तारा निखळला आणि प्रेक्षक एका दिलखूलास हसवणाऱ्या एका दिग्गज अभिनेत्याला मुकले. कादर खान यांच्याविषयी बोलताना त्यांची फॅमिली फ्रेंड आणि शेवटचा चित्रपट 'हो गया दिमाग का दही' ची प्रोड्यूसर डायरेक्टर फौजिया म्हणाली, 'डिप्रेशनमुळे त्यांची अशी हालत झाली होती. एवढेच नाही तर त्यांची स्मृतीही गेली होती. फौजिया कादर खान यांचा मुलगा शाहनवाज याच्याशी सतत संपर्कात होती. कादर खान यांना उपचारासाठी कॅनडामध्ये होते. त्यांची तब्येत खराब होण्याचे कारण त्यांची मनस्थिती होती.
2 वर्षांपासून अंथरुणाला खिळून होते कदर खान..
फौजियाने सांगितले, 'पहिले त्यांच्यावर व्हील चेयरवरून चालण्याची पाली आली. मग त्यानंतर वाढत्या वयासोबत त्यांचे चित्रपटापासूनही अंतर वाढले. ते एक अभिनेते होते, जे चित्रपटाच जगायचे. चित्रपट जणू त्यांचा श्वास होता. चित्रपटांपासून वाढलेले अंतर त्यांना सहन झाले नाही. मागच्या दोन वर्षांपासून ते अंथरुणावरच होते.
परेशान होते इंडस्ट्रीमधील कुणी त्यांना विचारात नव्हते...
फौजियाने सांगितले, 'ते मला म्हणाले होते की ते जुना चित्रपट 'शर्मा' (1981) चा रीमेक करू इच्छितात ज्याला त्यांनीच प्रोड्यूस केले होते. आम्ही त्याबद्दल बोलतही होतो. ते मला म्हणाले होते की याव्यतिरिक्तही त्यांनी खूप साऱ्या स्क्रिप्ट्स लिहिल्या आहेत. मी म्हणले होते की मी त्यांचे स्वप्न पूर्ण करायला मदत करेन".
मात्र जेव्हा ते बीमार पडले तेव्हा त्यांना हे सहन झाले नाही की, फिल्म इंडस्ट्रीमधील कुणीच त्यांना पाहायला किंवा त्यांना सपोर्ट करायला आले नाही. ते मला म्हणाले होते, 'कुणीच मला पाहायलासुद्धा आले नाही'.

Post a Comment