0
लंडन :

दिवंगत माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंगची माहिती होती, म्हणून हत्या करण्यात आली असा सनसनाटी आणि खळबळजनक खुलासा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टने केला आहे.

२०१४ ची लोकसभा निवडणुक पूर्वीच फिक्स करण्यात आली होती असा दावाही त्याने केला. ईव्हीएम कसे हॅक करण्यात आले याचा पुरावाही आपल्याकडे असल्याचा शुजा म्हणतो. हॅकर्सने केलेल्या कथित दाव्यामुळे आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी काही दिवसांचाच कालावधी राहिला असल्याने ईव्हीएमवरून पुन्हा एकदा रणकंदन माजण्याची शक्यता आहे.

Post a Comment

 
Top