0
काव्या ड्रीम मुव्हीजची निर्मिती

‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात त्यांचे पदार्पण झाले, ते अगदी अचानक आणि दर एपिसोडगणिक कधी हवालदार म्हणून, तर कधी लहान मुलगा म्हणून तो कोर्टात हजर होत राहिला. अभिनयाच्या क्षेत्रात जवळपास दहा ते बारा वर्षांपासून कार्यरत असलेला अभिनेता हा म्हणजे विनीत भोंडे. ‘मूर्ती लहान पण किर्ती लहान’ असेच त्याच्याबद्दल बोलावे लागेल.त्यानंतर तो 'बिग बॉस' मध्ये दिसला.तिथे त्याने सगळ्यांची मने जिंकून घेतली.पहिली कॅप्टनकी देखील अनुभवली.बिग बॉस नंतर गेल्या काही दिवसांपासून आता सध्या तो काय करतोय?हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता.या प्रश्नाचे उत्तर आता आम्हाला मिळाले आहे.

अभिनेता विनीत भोंडे सध्या काव्या ड्रीम मुव्हीज निर्मित 'कळस' या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटात १९८३ ते १९८५ या काळातली गोष्ट दाखवण्यात येणार असून या चित्रपटातील महत्वपूर्ण भूमिकेत विनीत दिसणार आहे.नुकतेच विनीतने या सिनेमाचे संपूर्ण कथानक वाचले असून या सिनेमाला होकार दिला आहे.या सिनेमात तो 'धर्मा' या महत्वपूर्ण भूमिकेत रसिकांच्या भेटीला येणार आहे.याबाबत विनीत म्हणतो,'मी चांगल्या सिनेमाच्या शोधात होतो.त्यावेळी या चित्रपटाचे लेखक आशिष निनगुरकर,दिग्दर्शक रोहन सातघरे व कॅमेरामन योगेश अंधारे यांची भेट झाली.त्यावेळी त्यांनी 'कळस' या सिनेमाची गोष्ट मला ऐकवली.ती गोष्ट ऐकून मी काही काळ सुन्न झालो.हतबल झालो आणि हा सिनेमा माझ्यासाठीच आहे असे मला वाटले.आजच्या समाजव्यवस्थेवर फेकलेला हा ओरखडा आणि वस्तूस्थिती मला या सिनेमात दिसली.मी या सिनेमातील माझ्या पात्राच्या प्रेमात पडलो आणि या भूमिकेसाठी तात्काळ तयारी सुरु केली."

अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात या सिनेमाचे चित्रीकरण होणार असून सिनेमाची संपूर्ण टीम यावेळी ऑनलोकेशन विनीतला भेटली.कायमच विनोदी भूमिका करणारा विनीत भोंडे हा कलावंत या सिनेमातून एका आगळ्यावेगळ्या भूमिकेतून आपल्या भेटीला येणार आहे.'कळस' या सिनेमाचे दिग्दर्शन रोहन सातघरे करत असून लेखन आशिष निनगुरकर यांचे आहे.कॅमरामन योगेश अंधारे असून कलादिग्दर्शक गिरीश कोळपकर आहेत.क्रिएटिव्ह हेड सिद्धेश दळवी असून सुनील जाधव सहाय्यक निर्माते आहेत.अशी माहिती सिनेमाचे कार्यकारी निर्माते प्रतीश सोनवणे यांनी दिली. हा सिनेमा अभिनेता विनीत साठी वेगळा ठरणार आहे.हा सिनेमा रसिकांसाठी पर्वणी असेल यात तिळमात्र शंका नाही.लवकरच या सिनेमाचे चित्रीकरण सुरु होणार असून इतर कलाकारांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.तूर्तास अभिनेता विनीतला या सिनेमासाठी शुभेच्छा देवूया.
vineet bhonde in upcoming marathi movie kalas

Post a Comment

 
Top