0
गुणवत्ता यादीमधून १:५ या गुणोत्तराने उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र ठरतील.

अमरावती- पोलिस भरती पद्धतीत यंदापासून बदल करण्यात आला आहे. त्यानुसार पहिला टप्पा लेखी परीक्षेचा राहील. यातील गुणवत्ता क्रमानुसार उमेदवारांना मैदानी चाचणी द्यावी लागेल. गृह विभागाने नुकताच यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. आतापर्यंतच्या प्रक्रियेत शंभर गुणांची होणारी मैदानी चाचणी हा पहिला टप्पा होता. त्यामध्ये गुणानुक्रमानुसार एका जागेसाठी पंधरा उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरायचे. त्यानंतर ७५ गुणांची लेखी परीक्षा व्हायची. लेखी व मैदानी चाचणीमधील १७५ गुणांपैकी मिळणाऱ्या गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी प्रकाशित व्हायची. या प्रक्रियेत मात्र उमेदवाराचेही अनेक दिवस जायचे, पोलिसांनाही महिना-महिना भरती प्रक्रिया राबवावी लागत होती. म्हणूनच यंदापासून भरती प्रक्रियेतील पहिलाच टप्पा लेखी परीक्षा ठेवला आहे. नवीन नियमांनुसार होणारी लेखी परीक्षा १०० गुणांची असेल. या परीक्षेसाठी ९० मिनिटांचा वेळ मिळेल. पुढील टप्प्यात पात्र ठरण्यासाठी लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता क्रमानुसार यादी प्रसिद्ध होईल. गुणवत्ता यादीनुसार उपलब्ध जागेसाठी १:५ या गुणोत्तराने उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी पात्र ठरवले जाईल. या प्रकारे लेखी परीक्षेतील १०० आणि मैदानी परीक्षेतील ५० अशा एकूण १५० गुणांपैकी उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीमध्ये मागील वर्षीपर्यंत मैदानी चाचणीदरम्यान उमेदवारांना लांब उडी आणि पुलअप्स हे दोन प्रकार होते. नवीन बदलानुसार मात्र उमेदवारांना मैदानी चाचणीदरम्यान पुलअप्स आणि लांब उडी हे दोन्ही प्रकार हद्दपार झाले आहेत.

पोलिस आणि उमेदवारांचा वेळ वाचणार :
पोलिस भरतीमध्ये पहिल्यांदा लेखी परीक्षा होणार आहे. या गुणवत्ता यादीमधून १:५ या गुणोत्तराने उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र ठरतील. तसेच एसआरपीएफसाठी मैदानी चाचणी १०० गुणांची होणार आहे. नवीन बदलाबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून आम्हाला माहिती प्राप्त झाली आहे. असे अमरावतीच्या, एसआरपीएफ गट क्रमांक ९ चे समादेशक महेश चिमटे यांनी सांगितले. Now first written test after that ground test in Police bharti

Post a comment

 
Top