सातारा/परळी :
सातार्यात सध्या खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील संभाव्य मनोमीलनाची जोरदार चर्चा असून त्याचा प्रत्यय देणार्या विविध घटनाही घडत आहेत. असे असताना आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी मात्र रविवारी या घटनांना छेद देणारे वक्तव्य केल्याने राजकीय पटलावर खळबळ उडाली आहे. मनोमीलनाची चर्चा फक्त व्हॉटस् अॅप, फेसबुक व सोशल मीडियावरच आहे. मात्र, पुलाखालून बरेच पाणी गेले आहे, कोर्ट-कचेर्या झाल्या आहेत, त्यामुळे आता कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याची भूमिका आ. शिवेंद्रराजे यांनी रविवारी संध्याकाळी स्पष्ट केली.
नगरपालिकेच्या निवडणुकीत सातार्याच्या राजघराण्याचे ऐतिहासिक मनोमीलन तुटल्यानंतर आ. शिवेंद्रराजेंच्या पत्नी सौ. वेदांतिकाराजे यांचा थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला. हा पराभव आ. शिवेंद्रराजेंच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे आमदार-खासदारांमध्ये टोकाचे वितुष्ट निर्माण झाले होते. त्यानंतर सुरूची राडा आणि आनेवाडी प्रकरण झाल्यानंतर हे वितुष्ट आणखी वाढले होते. दरम्यानच्या काळात सातार्यातील दारू दुकानाच्या मुद्द्यावरून दोन्ही राजे समोरा-समोर आले होते. दोघांनी एकमेकांसमोर एकमेकांच्या गाड्याही लावल्या होत्या. दरम्यानच्या काळात जहरी पत्रकबाजी झाली होती. हा संघर्ष भडकत असतानाच आगामी लोकसभा- विधानसभा निवडणुकीमुळे पुन्हा चित्र बदलू लागले. लग्न समारंभात एकत्र आल्यानंतर खांदा दाबादाबी झाली.
आता तर खा. शरद पवार यांनी स्वत:च दोघांसाठी पुढाकार घेतल्याचे चित्र निर्माण झाले. शनिवारी एका हॉस्पिटलच्या उद्घाटनाला जाताना शिवेंद्रराजेंनी शरद पवारांचे सारथ्य केले. गाडी होती शिवेंद्रराजेंची मात्र गाडीत बसले खा. उदयनराजे व आ. शशिकांत शिंदेही. साहजिकच मनोमीलनाच्या चर्चांना पुन्हा ऊत आला. प्रजासत्ताक दिनी सातार्यातील दोन-तीन हॉटेलांची उद्घाटनेही दोघांनी एकत्रितपणे केली. मात्र, दोघेही एकमेकांशी बोलले नाहीत. यावर कडी म्हणजे रविवारी सकाळी रनर्स फौंडेशनच्या कार्यक्रमात दोन्ही राजे पुन्हा एकत्र आले. रनर्सच्या इच्छेखातर दोघांनीही फोटोसेशन केले. व्हिक्टरीची निशाणीही केली आणि पुन्हा एकदा यवतेश्वर घाटातच मनोमीलन पक्के झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फिरल्या. आता दोन्ही राजे मनोमीलन केव्हा जाहीर करणार याकडे डोळे लागले असतानाच रविवारी संध्याकाळी परळी खोर्यातील कुस बु॥ येथील कार्यक्रमात आ. शिवेंद्रराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, सध्या सोशल मीडियावर तसेच व्हॉटस्अपवर मनोमीलनाचे फोटो व्हायरल होत आहेत. आमचे मनोमिलन झाले आहे अशा चर्चा सुरू आहेत. मात्र, प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही. मनोमीलनाबाबत बातम्या येत आहेत. मात्र, पुलाखालून पाणी बरेच वाहून गेले आहे. पोलीस स्टेशन, कोर्ट कचेर्या झाल्यात, नागरिकांना त्रास झालाय. तुम्हाला असे वाटेल आता बाबांचे जमलयं म्हणून बिनधास्त राहाल तर असे काही नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या मनोमीलनावर विश्वास ठेवू नका, अशी स्पष्ट भूमिका आ. शिवेंद्रराजेंनी जाहीरपणे मांडली आहे. आ. शिवेंद्रराजेंच्या या जाहीर भूमिकेमुळे आता खा. उदयनराजे कोणती जाहीर भूमिका घेतात याविषयी उत्सुकता आहे.

Post a Comment