0
पुणे : प्रतिनिधी 

शांततप्रिय शहर म्हणून ओळख असलेले पुणे सध्या खूनाच्या घटनांनी हादरुन गेले आहे. सलग चौथ्या दिवशी खुनाचा प्रकार समोर आला आहे. वारजे माळवाडी येथे एका पंधरा वर्षाच्या मुलाचा खून करुन मृतदेह पुरण्यात आल्याची घट्ना धक्‍कादायक घडली आहे. ही घट्ना समोर येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
निखील आमरुळकर असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान पुरण्यात आलेल्या मृतदेह काढण्याचे काम सुरू असून, घटनास्‍थळी पोलिस दाखल झाले आहेत. खुनामागचे नेमके कारण समजू शकले नाही.


Post a Comment

 
Top